शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया परवानगीसाठी दीड लाखांची मागितली लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:47 IST

परवानगी देण्यासाठी ८० हजार घेताना जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक म्हणून काम करणारा तुषार सावरकर (वय ३४) आणि रहेजा रुग्णालयात ट्रान्सप्लान्ट  को-ऑर्डिनेटर सचिन साळवे (वय ३२)या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल ताब्यात घेण्यात आले आहे. 

मुंबई - किडनी प्रत्यारोपण शस्रक्रियेच्या कायदेशीर परवानगीसाठी दीड लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार जे. जे. रुग्णालयात उघडकीस आला आहे. परवानगी देण्यासाठी ८० हजार घेताना जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक म्हणून काम करणारा तुषार सावरकर (वय ३४) आणि रहेजा रुग्णालयात ट्रान्सप्लान्ट  को-ऑर्डिनेटर सचिन साळवे (वय ३२)या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल ताब्यात घेण्यात आले आहे.  ४ ऑक्टोबरपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. एका रुग्णाला रहेजा रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची होती. याकरिता कायदेशीर परवानगी घ्यावी लागेल असे रहेजा रुग्णालयामार्फत रुग्णाला सांगण्यात आले. ही प्रक्रिया तसेच परवानगीसाठी रहेजा रुग्णालयात ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेटर म्हणून काम करणारा सचिन साळवे याला मदतीस देण्यात आले. सचिन याने रुग्णाच्या अहवालाची फाइल जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक तुषार सावरकर यांच्याकडे पाठवली. ही फाइल लवकरात लवकर मंजूर व्हावी आणि परवानगी मिळावी यासाठी सचिनने स्वतःसाठी आणि तुषार सावरकर यांच्यासाठी दीड लाख रुपयांची रुग्णाकडे मागणी केली. इतकी मोठी रक्कम एकत्र देणं शक्य नसल्याने ८० हजारांपर्यंत तडजोड करण्यात आली. संबंधित रुग्णाने हा सर्व प्रकार आपल्या मित्राला सांगितला. त्याने पैसे न देता याबाबत एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तुषार सावरकर यांच्या कार्यालयात काल सापळा लावला. या कार्यालयात ८० हजारांची रोकड घेताना सचिन याला रंगेहाथ पकडण्यात एसीबीला यश आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय