शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Breaking : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:35 IST

Shiv Sena MLA Pradip Jaiswal Convicted : २०१८ मध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री जाऊन त्यांनी ठाणे अंमलदारासमोरची काच फोडली होती, खुर्ची फेकली होती.

ठळक मुद्देशिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक अजय सुर्यवंशी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.११ आणि १२ मे २०१८ रोजी औरंगाबादमध्ये  झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली.

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व दंड ५००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  सरकारी मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम -३  भादंवि कलम ३५३,३३२, ५०४, ५०६, ४५७ अन्वये ही कारवाई करण्यात आली होती. सरकारी अभियोक्ता म्हणून ए. एस. देशपांडे यांनी कामकाज पाहिले. कलम ३५३ नुसार ६ महिने कारावास आणि २५०० रुपये दंड, अथवा दंड न भरल्यास एक महिना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कलम ५०६ अन्वये ६ महिने कारावास व २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावली आहे. 

२०१८ मध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री जाऊन त्यांनी ठाणे अंमलदारासमोरची काच फोडली होती, खुर्ची फेकली होती. या प्रकरणात त्यांना तीन दिवस न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक अजय सुर्यवंशी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

काय आहे प्रकरण ११ आणि १२ मे २०१८ रोजी औरंगाबादमध्ये  झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली. याविषयी माहिती मिळताच रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आ. प्रदीप जैस्वाल हे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे खुर्चीवर बसलेले होते. यावेळी ते गांधीनगर येथील आरोपींना जामिनावर सोडा, असे म्हणाले. आरोपींना अटक करणारे सहायक पोलीस निरीक्षक शेख अकमल आहेत. त्यांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतो, असे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोटे यांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख हे लगेच ठाण्यात आले आणि त्यांनी जैस्वाल यांना सांगितले की, गांधीनगर येथूनच दंगलीला सुरुवात झाली आहे, या गुन्ह्याचा तपास करायचा आहे. काही वेळानंतर जैस्वाल यांनी ठाणे अंमलदार पोटे यांना तुम्ही तुमचे काम बंद करा, आताच्या आता तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा, तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत, असे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली. उद्या शहरामध्ये काय घडते ते बघा, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्यांनी पेन स्टॅण्डने टेबलावरील काच फोडली. यावेळी त्यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्त्यांनी आणि सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी जैस्वाल यांना समजावून सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते त्यांना घरी घेऊन गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पोटे यांनी जैस्वालविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाºयांना धमकावणे आणि अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Courtन्यायालयShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसMLAआमदारArrestअटक