BREAKING पाक हादरलं : क्वेट्टातील मशिदीत बॉम्बस्फोट; पोलीस अधिकाऱ्यासह १५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:07 PM2020-01-10T22:07:22+5:302020-01-10T22:08:33+5:30

क्वेट्टातल्या मिशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाने पाकिस्तान आज हादरलं

Breaking : Bomb blast in mosque at Quetta; 10 killed, including police officer | BREAKING पाक हादरलं : क्वेट्टातील मशिदीत बॉम्बस्फोट; पोलीस अधिकाऱ्यासह १५ जणांचा मृत्यू

BREAKING पाक हादरलं : क्वेट्टातील मशिदीत बॉम्बस्फोट; पोलीस अधिकाऱ्यासह १५ जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देबलुचिस्तानमधल्या एका मशिदीत हा भीषण बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात १५ जण मृत्युमुखी पडले आहेत मशिदीचा इमाम आणि पोलीस उपअधीक्षक अमानुल्लाह यांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला

पाकिस्तान - क्वेट्टातल्या मिशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटानेपाकिस्तान आज हादरलं आहे. बलुचिस्तानमधल्या एका मशिदीत हा भीषण बॉम्बस्फोट झाला असून या स्फोटात १५ जण मृत्युमुखी पडले आहेत तर २१ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक माहिती म्हणजे मृतांमध्ये क्वेट्टाचा पोलीस अधिकारी आणि मशिदीचा इमाम यांचा समावेश आहे.


शुक्रवार असल्याने प्रार्थनेसाठी मशिदीत जास्त लोक जमा झाले होते. मशिदीचा इमाम आणि पोलीस उपअधीक्षक अमानुल्लाह यांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि क्वेट्टा डीआयजी अब्दुल रझाक चिमा यांनी दिली. नमाजाची वेळ असल्याने हा बॉम्बस्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दल आणि बीडीएस (बॉम्ब नाशक पथक) घटनास्थळी पोचले असून छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांची शोध मोहिम सुरू असल्याचं पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितलं आहे. बॉम्बस्फोट करणाऱ्यांना शोधून काढून असंही पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

Web Title: Breaking : Bomb blast in mosque at Quetta; 10 killed, including police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.