सात दिवसांपूर्वी प्रेयसीचा साखरपुडा; नाराज प्रियकराचे प्रेयसीवर चाकूनं सपासप वार अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:55 IST2021-09-08T14:55:07+5:302021-09-08T14:55:19+5:30

मृत प्रेयसी कायद्याची विद्यार्थिनी असून जोधपूरमधील वसतिगृहात ती वास्तव्यास होती

boyfriend kills girlfriend then commits suicide in rajasthan jodhpur | सात दिवसांपूर्वी प्रेयसीचा साखरपुडा; नाराज प्रियकराचे प्रेयसीवर चाकूनं सपासप वार अन् मग...

सात दिवसांपूर्वी प्रेयसीचा साखरपुडा; नाराज प्रियकराचे प्रेयसीवर चाकूनं सपासप वार अन् मग...

जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकरानं प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसी लक्षिता पाली सोजतची रहिवासी असून ती जोधपूरमध्ये एका वसतिगृहात राहून कायद्याचं शिक्षण घेत होतं. तर तिचा प्रियकर नागौरचा रहिवासी आहे. दोघेही सोमवारी रात्री जोधपूरच्या जालोरी गेटजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

मंगळवारी सकाळी मंडोर रेल्वे स्टेशनजवळ प्रियकर हेमंतचा मृतदेह आढळून आला. हेमंत कपड्याचा व्यापारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जालोरी गेट परिसरात असलेल्या सिद्धिविनायक हॉटेलमध्ये एक तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. सरदारपुरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी लक्षिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या. 

लक्षिताचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. लक्षिताचा मृतदेह हॉटेलमध्ये सापडला असताना हेमंतचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ आढळून आला. त्याच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. हेमंतच्या खिशात त्याचं ओळखपत्र होतं. त्यावरून तो नागौरचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

लक्षिता जोधपूरमधल्या वसतिगृहात राहून कायद्याचं शिक्षण घेत होती. हेमंत आणि लक्षिता यांचे ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आठवड्याभरापूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवून पुढील तपास सुरू केला आहे.
 

Web Title: boyfriend kills girlfriend then commits suicide in rajasthan jodhpur