सरकारी नोकरी लागल्यावर बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला सोडलं, तरूणाच्या दाव्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:47 AM2022-04-28T11:47:38+5:302022-04-28T11:48:19+5:30

Bihar : मीडिया रिपोर्टनुसार, प्रवेश रंजक गावातील एका तरूणीच्या प्रेमात पडला. दोघे कुणालाही न जुमानता एकमेकांवर प्रेम करत होते.

Boyfriend ditch girlfriend after get government even refuse to meet know new twist | सरकारी नोकरी लागल्यावर बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला सोडलं, तरूणाच्या दाव्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट

सरकारी नोकरी लागल्यावर बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला सोडलं, तरूणाच्या दाव्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट

googlenewsNext

बिहारच्या (Bihar) मुंगेर जिल्ह्यातून एक विचित्र प्रेम कहाणी समोर आली आहे. गर्लफ्रेन्डने आरोप केला की, सरकारी नोकरी लागल्यानंतर तिच्या बॉयफ्रेन्डने तिला सोडलं. इतकंच नाही तर त्याने तिला भेटण्यासही नकार दिला. प्रेयसीचा आरोप आहे की, तिच्या प्रियकराने बरीच वर्ष तिच्यासोबत संबंध ठेवले. आता सरकारी नोकरी लागल्यावर त्याने लग्नास नकार दिला. 

तरूणीने पोलिसांत याबाबत तक्रार केली आणि न्यायाची मागणी केली. स्थानिक पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत चौकशी सुरू केली. तेच तरूणाने सांगितलं की तरूणीचं लग्न ४ वर्षाआधीच झालं आहे आणि ती त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारी नोकरी लागल्यानंतर प्रेयसीला सोडल्याच्या या प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रवेश रंजक गावातील एका तरूणीच्या प्रेमात पडला. दोघे कुणालाही न जुमानता एकमेकांवर प्रेम करत होते. आरोप आहे की, प्रवेशने प्रेयसीला नोकरी लागल्यावर लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. तरूणीने नकार दिला तरी तो तिच्यासोबत शरीरिक संबंध ठेवत होता. सोबतच त्यांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणंही सुरू होतं. दरम्यान प्रवेशला पोलिसात चालक पदावर नोकरी लागली. तो सध्या प्रशिक्षण घेत आहे.

प्रवेशला जेव्हा नोकरी लागली तेव्हा प्रेयसी त्याला लग्नाबाबत विचारलं. यावर प्रवेशने आपला मोबाइल फोन बंद केला. तरूणी जेव्हा त्याला प्रशिक्षण सेंटरवर भेटायला गेली तेव्हा त्याने भेटण्यास नकार दिला. यानंतर तरूणी प्रवेशच्या आई-वडिलांना भेटली आणि त्यांचं प्रकरण सांगितलं. तेव्हा त्यांनीही तिचं काही ऐकलं नाही. नातेवाईक म्हणाले की, प्रवेश स्वत: त्यांचा मालक आहे. तरूणीचा आरोप आहे की, प्रवेशने नोकरीनंतर लग्नाचं आमिष दिलं होतं आणि त्याआधारेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. 

पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली आहे. तेच प्रवेश म्हणाला की, तो तरूणीला गावातील असल्याने ओळखतो. त्याशिवाय त्याचा तरूणीसोबत काहीही संबंध नाही. प्रवेशने दावा केला की, तरूणीचं चार वर्षाआधी  शेजारच्या गावातील तरूणासोबत झालं आहे. तरूण म्हणाला की, नोकरी लागल्याने तरूणी त्याच्यावर आरोप लावत आहे. प्रवेशने असाही दावा केला की, तरूणीच्या लग्नाचे फोटोही त्याच्याकडे आहेत. अशात या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
 

Web Title: Boyfriend ditch girlfriend after get government even refuse to meet know new twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.