शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या, मनाला चटका लावणारी लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:13 IST

प्रेयसीला काहीच व्हायला नको. मी स्वत:च आत्महत्या करतो. असं म्हणत २५ वर्षीय तरूणाने अंगावर पेट्रोल घेऊन पेटवून घेत आत्महत्या केली. 

प्रेमात असलेले लोक आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काय करतील काही नेम नसतो. एका तरूणाने तर प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी चक्क आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आहे तामिळनाडू्या रामनाथपुरम येथील. तरूण प्रेम विवाहाचा प्रस्ताव  घेऊन तरूणीच्या घरी गेला होता. तिथे मुलीकडचे लोक त्याला म्हणाले की, हा सगळा प्रकार मुलीमुळे घडतोय, मुलगीच राहणार नाही तर हे प्रकरण होणार नाही. यावर प्रियकर विजय म्हणाला की, प्रेयसीला काहीच व्हायला नको. मी स्वत:च आत्महत्या करतो. असं म्हणत २५ वर्षीय तरूणाने अंगावर पेट्रोल घेऊन पेटवून घेत आत्महत्या केली. 

विजय इंजिनिअरींगचं शिक्षण घेत असताना अपर्णा श्री नावाच्या तरूणीला भेटला होता. नंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. शिक्षण पूर्ण झाल्यावर विजयला एका कंपनीत नोकरी लागली. त्यामुळे तो चेन्नईला गेला. 

विजयला त्याच्या मित्रांकडून समजलं की, अपर्णाच्या घरातील लोकांना तुमच्या रिलेशनशिपबाबत समजलं आहे. हे नातं तोडण्यासाठी त्यांनी तिच्याकडून फोन हिसकावून घेतला आहे. हे समजल्यावर विजय अपर्णाच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेला होता. पण अपर्णाच्या घरातील लोक या लग्नासाठी तयार नव्हते. (हे णण वाचा : प्रेम विवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात पत्नीची हत्या; रात्रभर मृतदेहाजवळ बसून होता पती, मग केला असा बनाव)

यानंतर विजयने अपर्णाच्या घरातील लोकांना एक आठवड्याचा वेळ दिला आणि म्हणाला की,  तो पुन्हा लग्नाची परवानगी घेण्यासाठी येईल. यादरम्यान अपर्णाच्या घरातील लोकांनी महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. शनिवारी विजय पुन्हा अपर्णाच्या घरी आला. लग्नासाठी नकार देत अपर्णाच्या घरातील लोक कथितपणे म्हणाले की, अपर्णाच राहणार नाही तर सगळं प्रकरण बंद होईल. 

हे ऐकल्यावर विजयला धक्का बसला. असं सांगितलं जात आहे की, यानंतर विजय पेट्रोल घेऊन आला आणि अपर्णाच्या घरासमोरच त्याने स्वत:ला पेटवून घेतलं. त्याआधी तो म्हणाला की, अपर्णाला काही झालं नाही पाहिजे. त्यापेक्षा तो स्वत: जीव देईल. (हे पण वाचा : अमेरिकेत बसून त्याने रचला पत्नीच्या हत्येचा कट, ट्रकखाली चिरडून केली हत्या; असा झाला खुलासा)

विजयच्या शरीराला लागलेली आग बघता शेजाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आग विझवली गेली आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर विजयला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट