शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरात घुसला प्रियकर, पतीने पकडले आणि दिला बेदम चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 20:34 IST

Crime News: विवाहित प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला सदर महिलेच्या पतीने चांगलीच अद्दल घडवली.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील ललितपूरमध्ये विवाहित प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराला सदर महिलेच्या पतीने चांगलीच अद्दल घडवली. या महिलेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर घरी आल्याचे कुणीतरी तिच्या पतीला सांगितले. (Crime News) त्यानंतर पतीने अचानक घरात धडक देत मित्रांच्या मदतीने त्याला पकडले आणि त्याची धुलाई केली. एवढेच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओही तयार केला आणि तो व्हायरल केला. दरम्यान, चोप दिल्यानंतर या महिलेच्या प्रियकराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (The boyfriend broke into her house to meet the married Girlfriend, The husband grabbed and beat him)

वर्णी जैन इंटर कॉलेजच्या मागे राहणाऱ्या महिलेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर तिच्या घरी आला होता. याच दरम्यान कुणीतरी तिच्या पतीला याची माहिती दिली. तेव्हा तिचा पतीही मित्र मंडळींना जमवून तिथे पोहोचला. त्याने त्याच्या पत्नीच्या प्रियकराची धुलाई केली.

यादरम्यान ही महिला तिच्या प्रियकराला वाचवताना दिसत होती. तिने सांगितले की, सकाळी पतीने आणि या तरुणाने एकत्र चहा पिली होती. तसेच रात्री एकत्र बसून मद्यपान केले होते. मात्र दुपारी हा तरुण एकटा घरात काय करत होता, यावरून सदर पतीचा राग अनावर झाला होता. त्याने आणि त्याच्या मित्रांनी त्याला मारहाण केली. तसेच या मारहाणीचा व्हिडीओही बनवला.

ज्या तरुणाला पकडून मारहाण करण्यात आली. तो गुपचूप मार खात होता. त्याने अजिबात विरोध केला नाही. तसेच मारहाणीनंतर या प्रियकराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आता या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार