शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने महाविद्यालयाबाहेर तरुणीला केली मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 21:34 IST

या प्रकरणी त्या तरुणास पोलीसांनी अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

ठळक मुद्देभाईंदरच्या नवघर येथे असलेल्या महाविद्यालयासमोर आज मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.तिने  देखील तु निघ असे प्रत्युत्तर देताच संतापलेल्या विनीतने तिचा गळा धरुन कानाखाली मारले.

मीरारोड - दुसऱ्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर १९ वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीने प्रियकराशी  प्रेमसंबंध तोडले. त्यामुळे  चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेरच तिला गाठून मारहाण केली. तिला सोडवण्यास मध्ये पडलेल्या विद्यार्थ्यास देखील त्याने व मित्रांनी मारहाण केली. या प्रकरणी त्या तरुणास पोलीसांनी अटक केली असून त्याच्या तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.भाईंदरच्या नवघर येथे असलेल्या महाविद्यालयासमोर आज मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थीशी गेल्यावर्षी वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात असताना तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विनीत प्रमोद पाटील (२०) याने तिच्याशी ओळख केली होती. विनीतने इंस्टाग्रामवर तिला मैत्रीची विनंती पाठवली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. परंतु गेल्या वर्षीच्या नवरात्रीत विनीत व ती तरुणी बोलत असताना एका मुलीने येऊन विनीतशी आपले प्रेमसंबंध असल्याचा भांडाफोड केला.आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्या विद्यार्थीनीने विनीतशी असलेले प्रेमसंबंध कायमचे तोडून टाकले होते. परंतु विनीत मात्र तिचा सतत पाठलाग करत असे व बोलण्यासाठी तगादा लावत असे. मंगळवार ७ जानेवारी रोजी सकाळी विनीत पाठलाग करत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचला. तेथे जाऊन त्याने तिने भेट म्हणून दिलेले शर्ट व रिंग तिला परत केली व तिला चल निघ असे रागाने म्हणाला. तिने  देखील तु निघ असे प्रत्युत्तर देताच संतापलेल्या विनीतने तिचा गळा धरुन कानाखाली मारले. यावेळी तिचा सहकारी विद्यार्थी सोडवण्यास मध्ये पडला असता विनीतने व त्याच्या तीन मित्रांनी त्याला शिवीगाळ दमदाटी करत बेदम मारहाण केली. या प्रकरणी नवघर पोलीसांनी आरोपी विनीत याला अटक केली असून त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcollegeमहाविद्यालयmira roadमीरा रोड