शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

हत्या की अपघात? मुलगा पोलीस ठाण्यात वडिलांची मिसिंग तक्रार द्यायला गेला; मिळाली मृत्यूची बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 00:17 IST

पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. परिसरात सुरू असलेली उलटसुलट चर्चा आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी काही संशयितांना पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चाैकशी सुरू होती.

नागपूर- रात्रीपासून बेपत्ता असलेल्या एका वाहनचालकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी त्यांचा मुलगा मंगळवारी दुपारी बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचला अन् तेथे त्याला वडिलांच्या मृत्युचीच बातमी मिळाली.   अरुण गोपीचंद घरडे (वय ५३) असे मृताचे नाव असून, ते बेसा परिसरात राहायचे. घरडे बोलेरो मालवाहक चालवायचे. सोमवारी रात्री ते वाहन घेऊन वाडीकडे गेले होते. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलासोबत त्यांचे बोलणे झाले. लवकर येतो, असे सांगणारे घरडे मध्यरात्रीपर्यंत घरी परतले नाही. त्यांचा मोबाईलही बंद होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलीस पाटलाने बेलतरोडी पोलिसांना आऊटर रिंग रोडलगच्या झाडाझुडपात एक मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. पोलीस तेथे पोहचले तेव्हा घरडेंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. मृतदेहावर जखमाही दिसत होत्या. बाजूलाच त्यांचे बोलेरो वाहनही होते. त्यामुळे हत्येचा संशय होता. घटनास्थळी पोलीस पंचनामा करीत असतानाच घरडे यांच्या कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलीस ठाणे गाठले. वडील बेपत्ता असल्याचे घरडे यांचा मुलगा सचिन याने पोलिसांना सांगितले. बोलेरो वाहन ते घेऊन गेले होते, ही माहिती मुलाने देताच पोलिसांनी त्याला घटनास्थळी नेले. तेथे मृतदेह दाखवताच घरडे कुटुंबीयांनी टाहो फोडला. तो मृतदेह अरुण घरडे यांचाच होता. त्यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला. 

पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. परिसरात सुरू असलेली उलटसुलट चर्चा आणि मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी काही संशयितांना पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चाैकशी सुरू होती.

लिफ्टमुळे ॲक्सिडेंट?बेसा-बेलतरोडी भागातील एका इमारतीत असलेल्या एका महिलेच्या फ्लॅटमध्ये घरडे गेले होते. तेथे लिफ्ट अंगावर पडून ते गंभीर जखमी झाल्याची जोरदार चर्चा आहे. आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या घरडेंना उचलून वाहनात घातले आणि बेलतरोडी रिंगरोडवर फेकून दिल्याचेही सांगितले जाते. पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड आणि सहकारी प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस