शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिला म्हणून तरूणीने केलं तरूणाचं अपहरण, मंदिरात जबरदस्ती करणार होती लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:05 IST

UP Crime News : पोलिसांनुसार, तरूणाने लग्नास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरूणीने आपला भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून तरूणाचं अपहरण केलं. तरूणाला जबरदस्ती आर्य समाज मंदिरात नेण्यात आलं.

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बिजनौरच्या चांगपूरमध्ये ज्यूडिशिअल मॅजिस्ट्रेटच्या स्टेनोचं सिनेमा स्टाइलने ऑफिसला जाताना अपहरण करण्यात आलं. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. त्यानंतर चार तासातच पोलिसांनी अपहरण झालेल्या तरूणाचा शोध लावला.  तर तसेच पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरूणीला आणि तिच्या भावाच्या साथीदारांना अटक केली.

पोलिसांनुसार, तरूणाने लग्नास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरूणीने आपला भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून तरूणाचं अपहरण केलं. तरूणाला जबरदस्ती आर्य समाज मंदिरात नेण्यात आलं. यादरम्यान तरूणाच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलीस मंदिरात पोहोचले आणि त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. तेच तरूणाला सुखरूप परत आणलं.

पोलीस अधिक्षक दिनेश सिंह यांनी सांगितलं की, चांदपूर ज्युडिशल मॅजिस्ट्रेटचे स्टेनो अंकुरचं ऑफिसला जाताना काही लोकांना अपहरण केलं होतं. त्याला कारमधून उचलून नेण्यात आलं होतं. अंकुर यावेळी त्याच्या साथीदारासोबत ऑफिसला जात होता.

या घटनेची सूचना मिळताच पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी अंकुरचा मोबाइल ट्रेस केला. त्यानंतर त्याचा पाठलाग केला. त्याद्वारे पोलीस आर्य समाज मंदिरात पोहोचले. अपहरण करणारी तरूणी आणि तिच्या भावाच्या मित्रांना पकडण्यात आलं आहे. इतर चार फरार झाले.  चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलं की, स्टेनो अंकुरचं लग्न 14 मे 2021 ला तरूणीसोबत होणार होतं. त्यावेळीच हुंडा, गाडी, भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. पण नंतर अंकुरने तरूणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.  

आरोपींनी सांगितलं की, तरूणाला लग्नासाठी अनेकदा समजावण्यात आलं. पण तो तयार नव्हता. त्यामुळे त्याचं तरूणीसोबत लग्न लावून देण्याच्या उद्देशाने त्याचं अपहरण करण्यात आलं. लग्न लावण्यासाठी त्यांना आर्य समाज मंदिरात नेलं होतं. मंदिरात आरोपी तरूणीचं आणि अंकुरचं लग्न लावून देण्यात येणार होतं. जर तो लग्नासाठी तयार झाला नसता तर त्याची हत्या करण्यात येणार होती.

अंकुरने सांगितलं की, त्याचं लग्न या तरूणीसोबत ठरलं होतं. पण फोनवर बोलल्यावर त्यांच्यात काहीतरी वाद झाला. यानंतर त्याने लग्नास नकार दिला. यादरम्यान दोन्हीकडील लोकांमध्ये अनेक बैठकी झाल्या. हुंड्यातील सगळं काही करण्याचं ठरलं होतं. मुलीकडील लोकांनीही हे मान्य केलं. पण घरी जाऊन नकार देत होते आणि आरोपी जबरदस्ती लग्न करण्यास दबाव टाकत होते.

लग्न न केल्यास जीवे मारण्याची आणि अपहरण करण्याची धमकी दिली जात होती. अशातच गुरूवारी ऑफिसला जात असताना अंकुरची बाइक अडवली गेली आणि त्याला एका कारमध्ये टाकून नेण्यात आलं. आर्य समाज मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात येणार होतं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी