शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑन ड्युटी’ ओल्या पार्टी प्रकरणी दोघे निलंबित; एक बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 21:33 IST

'On Duty' liquor party case : दोन अभियंते व एका कर्मचाऱ्याचा समावेश : मद्यप्राशन भोवले

ठळक मुद्देआकाशवाणी केंद्रामागे असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या कार्यालयात मद्य पार्टी रंगल्याचा एक व्हिडिओ  गुरुवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जळगाव :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातच ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याप्रकरणी शाखा अभियंता आर. आर. ठाकूर, अनुरेखक एच.के. हसबन यांना निलंबित तर करार पद्धतीवर घेतलेल्या शाखा अभियंता टी.एस. गाजरे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.   

आकाशवाणी केंद्रामागे असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या कार्यालयात मद्य पार्टी रंगल्याचा एक व्हिडिओ  गुरुवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत याची चौकशी करण्यात आली असता तिघांची ओळख पटली. त्यानंतर मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंतांनी तातडीने कारवाई करीत ६ रोजी निलंबन व बडतर्फीचे आदेश काढले. 

यामध्ये निलंबित करण्यात आलेल्या आर.आर. ठाकूर यांचे निलंबन काळात मुख्यालय नंदुरबार कार्यालय राहणार असून पूर्व परवानगी शिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही व इतर खाजगी नोकरीही स्वीकारता येणार नसल्याचे मुख्य अभियंत्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. अशाच प्रकारे  अनुरेखक एच.के. हसबन यांना अधीक्षक अभियंत्यांनी  निलंबित केले आहे. 

नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी कार्यालयातच पार्टीमद्यपान करणाऱ्यांमधील टी.एस. गाजरे हे सेवानिवृत्त असून त्यांना सहा महिने कालावधीसाठी करार पद्धतीने २ ऑगस्टपासून  शाखा अभियंता म्हणून घेतले होते. त्यानंतर ३ रोजी कार्यालयातच गाजरे यांच्यासह वरील तिघांनी मद्यपान सुरू केले. त्यामुळे नोकरी लागून एकच दिवस नोकरी केली नाही तोच ४ ऑगस्टपासून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी काढले.

टॅग्स :suspensionनिलंबनJalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र