शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महामार्गावर 'रॉबरी' करणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 9:35 PM

आरोपी एमपीचे : गुन्ह्यात वापरलेली चारचाकी अपघातग्रस्त

अमरावती : महामार्गावर वाटमारी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. अटक आरोपी मध्यप्रदेशातील आहेत.        २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान लोणी महामार्गावर जीजे ०५ बीएक्स ८४२९ क्रमांकाचा ट्रक उभा असताना अज्ञात चार इसमांनी चारचाकी वाहनातून येऊन ट्रक चालकास चाकुचा धाक दाखविला. ट्रक चालकाजवळील १७ हजार रुपय रोख व ३ हजार रुपयांचा मोाबईल असा २० हजार रुपयांचा ऐवज जबरीने घेऊन पसार झाले. याप्रकरणी लोणी पोलिसांत भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व टोल नाक्यावरील फुटेजची पाहणी केली. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे सुनील रामचंद्र फुलेरीया (३४, रा. दुपाडा, जि. शाजापूर, मध्यप्रदेश) यांच्या नावाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. पथकाने खंडवा, इंदौर, भोपाळ, शाजापूर, देवास येथे विविध ठिकाणी ३ ते ४ दिवस तळ ठोकला. सदर वाहनाचा मालक सुनील रामचंद्र फुलेरीया हा मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील दुपाडा येथे असल्याबाबतची  माहिती मिळाली. दुपाडा हे चारचाकी वाहनातील डिझेल तसेच इतर मौलवान वस्तू चोरी करणाºया गुन्हेगारांचे गाव असल्याबाबत माहिती मिळाली. सदर पथकाने सुनील फुलोरीया याला ताब्यात घेतले. सदर आरोपीस गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्यात श्रावण हरनाथसिंग चौहान (२०, रा. विकासनगर, देवास, मध्यप्रदेश), धर्मेंद्र शिवनारायण सोलंकी (२५, रा. दुपाडा), कमल हे सहभागी असल्याबाबत सांगितले.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी