शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे दोघांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 23:52 IST

मृतांचे कुटुंबीय आणि गावातील लोक कामगारांच्या आत्महत्येचे कारण आर्थिक संकट हे देत आहेत.  

ठळक मुद्देपोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मुंबईहून परत आल्यानंतर त्यांच्याकडे रेशन वगैरे खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात लॉकडाऊनदरम्यान आपापल्या घरी पोहोचलेल्या दोन परप्रांतीय कामगारांनी आर्थिक पेचप्रसंगाने आत्महत्या केली. मटौंध पोलिस स्टेशन भागात बुधवारी एक युवक झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पैलानी  पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या दुसऱ्या एका कामगाराने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. मृतांचे कुटुंबीय आणि गावातील लोक कामगारांच्या आत्महत्येचे कारण आर्थिक संकट हे देत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. मटौंध पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक रामेंद्र तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन परिसरातील लोहरा गाव येथील सुरेश (वय 22) यांचा मृतदेह बुधवारी शेतात एका झाडाला लटकलेला आढळला.तो दिल्लीत लॉकडाऊनमध्ये अडकला होता आणि पाच दिवसांपूर्वी आपल्या गावी परत आला होता. मृत युवकाचे कुटुंबीय सांगतात की, दिल्लीहून परत आल्यानंतर सुरेशकडे पैसे खर्च करण्यासाठी नव्हते, त्यामुळे त्याने स्वत: ला फास लावून घेतला.अशीच आणखी एक घटना पैलानी पोलिस स्टेशन परिसरातील सिंधन कलां गावची आहे. दहा दिवसांपूर्वी मुंबईहून परत आलेल्या परप्रांतीय कामगार मनोज (वय 20) याने बुधवारी घराच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या अभिलाषच्या मते, मनोज मुंबईतील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. मात्र, लॉकडाऊननंतर त्यांची कंपनी बंद पडली. त्यानंतर तो गावी परतला. त्याचे आई - वडील  पूर्वी मरण पावले होते आणि तो अविवाहित होता. मुंबईहून परत आल्यानंतर त्यांच्याकडे रेशन वगैरे खरेदी करण्यासाठी पैसा नव्हता.पैलानी पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बलजीत सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर ग्रामस्थांनी मृत प्रवासी मजूर मनोज यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्याच्या आत्महत्येचे कारण ग्रामस्थ आर्थिक संकट असल्याचे सांगत आहेत, याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

 

एकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या

 

 

Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीMumbaiमुंबई