शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

लाच मागणारे दोघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 9:18 PM

तुझी नेमणूकीस असलेली पदस्थापना चुकीची आहे. त्याबाबत लेखापरीक्षण अहवालामध्ये नोंद घेवून नोकरी घालवतो. परंतु लाच दे नोकरी वाचवतो म्हणून...

 पंढरपूर : तुझी नेमणूकीस असलेली पदस्थापना चुकीची आहे. त्याबाबत लेखापरीक्षण अहवालामध्ये नोंद घेवून नोकरी घालवतो. परंतु लाच दे नोकरी वाचवतो म्हणून ६० हजार रुपयांची लाच  स्विाकरणाºया जिल्हा परिषद बांधकाम विभागातील दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पंढरपुरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता कार्यालयातील शाखा अभियंता ज्ञानेश्वर सुदाम पवार (रा. पाटकुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) व सोलापूर येथील स्थानिक निधी लेखा विभागातील वरीष्ठ लेखा परीक्षक धर्मा गोपीचंद पवार (रा. फ्लॅट नं. ४४, लक्ष्मीद्वीप अपार्टमेंट,  वैरशैव नगर, विजापूर रोड, सोलापूर) अशी नावे आहेत.

पंढरपुरातील जिल्हा परीषद बांधकाम विभाग येथे तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणून नोकरी करत आहेत. त्यांच्या कार्यालयाची सोलापुरातील स्थानिक निधी लेखा कार्यालयातील वरीष्ठ लेखापरीक्षक धर्मा पवार यांनी लेखा परीक्षण केले होते. त्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या कार्यालयात नेमणूकीस असलेले आणखी एक कर्मचारी यांची पदस्थापणा चुकीची असून त्याबाबत लेखापरिक्षण अहवालामध्ये नोंद घेऊन नोकरी घालवतो असे म्हणून तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ३० आॅक्टोंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक यांच्याकडून तक्रारदार यांचे तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात तक्रारदार यांच्याकडे धर्मा पवार व ज्ञानेश्वर पवार यांनी पंचासमक्ष १ लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ६० हजार रुपये घेण्याचे कबुल केले होते. ३१ आॅक्टोंबर रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अंभीयंता कार्यालयात लाचेचा सापळा रचण्यात आला होता.त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून ६० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर ज्ञानेश्वर पवार व धर्मा पवार यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अपरपोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. जगदीश भोपळे, सहाफौजदार निलकंठ जाधव, पोह. संजय बिराजदार, पोह. चंदकांत पवार, पोकॉ. सिध्दाराम देशमुख, पोकॉ. प्रफुल्ल जानराव, पोकॉ शाम सुरवसे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण