शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत दिला दिलासा  

By पूनम अपराज | Published: January 11, 2021 2:31 PM

Sonu Sood in Bombay High Court : सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे मुंबई उच्च न्यायालायने सूदला १३ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने होणाऱ्या कारवाईविरोधात सरंक्षण दिले आहे.  

कंगना राणौत आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात रंगलेल्या वादानंतर आता सोनू सूदविरुद्ध मुंबई महानगरपालिका असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेने जुहू येथील ६ मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याचा आरोप करताना सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याविरोधात सोनू सूदनंमुंबईउच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 

पालिकेने ४ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, सोनू सूदने जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारतीचं कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही अनधिकृत बदल करता येत नाहीत असं बीएमसीने सांगितले. सोनू सूदच्या वतीनं वकील डी पी सिंग यांनी मुंबईउच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा केला आहे.

न्यायाधीश पृथ्वीराज चव्हान यांच्या खंडपीठाकडे सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ''याचिकाकर्ता ( सोनू सूद) यांनी इमारतीच्या आराखड्यात कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्यांतर्गत ज्या बदलांना मान्यता आहेत, तेच करण्यात आले आहेत,''असे सिंग यांनी सांगितले.

सोनू सूदला पालिकेने ऑक्टोबरमध्ये नोटीस पाठवली होती, या नोटिशीविरोधात त्याने स्थानिक कोर्टात (सिव्हिल कोर्ट) धाव घेतली होती. सिव्हिल कोर्टाने सोनू सूदला ३ आठवड्यांची मुदत हायकोर्टात जाण्याची दिली होती. मुंबई उच्च न्यायालायने सूदला १३ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने होणाऱ्या कारवाईविरोधात सरंक्षण दिले आहे.  

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईMuncipal Corporationनगर पालिका