शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

दोन महिन्यांनी होणार ९३ सारखे बॉम्बस्फोट; नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 06:23 IST

नियंत्रण कक्षात एक जणाने दूरध्वनी करून वरील ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले जाणार असल्याचा इशारा दिला.

मुंबई : १९९३ मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले होते तशीच बॉम्बस्फोट मालिका दोन महिन्यांनंतर माहीम, भेंडी बाजार, नागपाडा, मदनपुरा या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बोलावण्यात आले आहे, असा इशारा देणारा दूरध्वनी शनिवारी सायंकाळी मुंबईपोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला आणि एकच खळबळ उडाली. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तातडीने हालचाल करत मालाड येथून एकास अटक केली. त्याचे नाव याह्या खान (५५) असे आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षात एक जणाने दूरध्वनी करून वरील ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले जाणार असल्याचा इशारा दिला. याबाबत एटीएसला माहिती मिळताच पथकाने तत्काळ दोन पथके तयार करत तपास सुरू केला. नियंत्रण कक्षात आलेल्या दूरध्वनीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून पथकाने मालाडच्या पठाणवाडीत राहणाऱ्या याह्या खानला मालाड रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपणच दूरध्वनी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल असून सन २०२१ मध्ये त्याला मालाड पोलिस ठाणेमार्फत तडीपार करण्यात आले होते. 

‘हॉटेलात ठेवलाय बॉम्ब’

८ जानेवारीला पहाटे एका अज्ञात व्यक्तीने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून, आपण एक गुंड असून हॉटेल दिल्ली दरबार येथे बॉम्ब पेरल्याचे सांगितले. दूरध्वनी करणारा मद्याच्या अमलाखाली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पथकाने तत्काळ हॉटेलमध्ये तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.तपासात गोविंद यादव उर्फ कालिया याने दूरध्वनी केल्याचे स्पष्ट होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत व्ही.पी. रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसBombsस्फोटकेMumbaiमुंबई