शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Nora Fatehi Summoned By ED: 200 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन; 'या' अभिनेत्रीची पुन्हा होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 11:59 IST

सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबतच ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

नवी दिल्ली - तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन बजावले आहे. नोराला समन जारी करत, या प्रकरणात आज चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ED तिचा जबाब नोंदवणार आहे. 

सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबतच ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने जॅकलीनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता.अनेक स्टार्सना फसवण्याचा होता कट -ईडीने या प्रकरणात या पूर्वीही जॅकलीनची चौकशी केली होती. आधी, जॅकलीनही या प्रकरणात सामील असावी, असे ईडीला वाटत होते. मात्र, नंतर ती स्वतःच या प्रकरणातील विक्टिम असल्याचे समोर आले. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमाने जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या आपल्या पहिल्या जबाबात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केली होत्या.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या चौकशीसाठी नोरा सहभागी होणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. सुकेश चंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल, 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिहार कारागृहात आहेत. बोलले जाते, की इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीलाही त्याच्या जाळ्यात अडकविण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते. 

टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbollywoodबॉलिवूड