बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने आज केली ६ तास चौकशी

By पूनम अपराज | Published: December 21, 2020 06:52 PM2020-12-21T18:52:53+5:302020-12-21T18:53:30+5:30

Drugs Case on Arjun Rampal : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करीत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतीक्षा होती.

Bollywood drug connection case: Actor Arjun Rampal was interrogated by NCB for 6 hours today | बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने आज केली ६ तास चौकशी

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने आज केली ६ तास चौकशी

Next
ठळक मुद्देरामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.

मुंबई :  बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास चौकशीसाठी हजर झाला. त्यानंतर त्याची जवळपास सहा तास चौकशी झाल्यानंतर तो एनसीबी कार्यालयातून सायंकाळी ६ वाजताच्यासुमारास बाहेर पडला. 

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करीत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा अखेर संपली आहे. ताे मुंबईत आल्यानंतर आज २१ डिसेंबर रोजी त्याची चौकशी केली गेली, असे सूत्रांनी सांगितले.

रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्याने हजर राहण्यास असमर्थता दर्शविली. वैयक्तिक कारणास्तव ताे परदेशात असल्याचे त्याने वकिलांमार्फत एनसीबीला कळविले होते.


दीड महिन्यांपूर्वी पथकाने त्याच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकून मोबाइल, लॅपटॉप, टॅब जप्त केले. त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सची सलग दोन दिवस तर रामपालची एकदा स्वतंत्रपणे कसून चाैकशीही करण्यात आली. त्याच्या चालकाकडेही विचारणा केली होती. ग्रॅबिएलाचा भाऊ अंजिलीयसला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आणखी काही माहिती हाती लागल्याने रामपालला चौकशीसाठी समन्स जारी केले होते. 

Web Title: Bollywood drug connection case: Actor Arjun Rampal was interrogated by NCB for 6 hours today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.