शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

भयंकर! कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 14:59 IST

Crime News : फरजानाबी शेख जाबीर या भाजल्या गेल्याने त्यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव - कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता दूध फेडरेशनच्या पाठीमागे असलेल्या राजमालती नगरात घडली. या घटनेत फरजानाबी शेख जाबीर (वय ४२) या भाजल्या गेल्याने त्यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राजमालतीनगरातील प्लॉट नं. ७ येथे पती जाबीर शेख, मुलगा अश्पाक व शोएब अशांसह वास्तव्यास आहेत. पती जाबीर सुपारी फोडण्याचे काम करतात तर फरजाना या धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावतात. रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे मुलं व पतीसाठी नाष्टा व स्वयंपाकासाठी फरजाना कणीक मळत होत्या, त्याच वेळेस पती जाबीरशेख अंघोळीला गेले. बाथरुम मध्येच बादलीत हिटर लावुन पाणी तापवण्यात आले होते. 

बादलीतील पाणी उकळायला लागल्यावर पती जाबीर याने उकळत्या पाण्याची बादली उचलून फरजाना यांच्या अंगावर उलटी केली. त्यात भाजल्या गेल्याने त्या किंचाळत धावत सुटल्या दोन्ही मुलांनी मदतीला धाव घेतली. यावेळी जाबीर यांनी दोघा मुलांना मारहाण केली. जावई गुलाब शेख व मुलांनी जखमी फरजाना यांना शासकिय रुग्णालयात दाखल केले असून तपास हवालदार रईस शेख करीत आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस