शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 19:45 IST

पोलिसांनी नवऱ्यावर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्दे रिना संदीप पांडे (27) यांचे संदीप आनंद पांडे (30) याच्यासोबत सप्टेंबर 2010 मध्ये लग्न झाले होते. रिनाने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन बरे झाल्यानंतर गुरुवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील गाळा नगर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय बायकोवर तिच्याच पतीने उकळते दूध फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात बायको गंभीरपणे भाजल्याने उपचारासाठी रुग्णालयात भर्ती केले होते. बरी झाल्यावर बायकोने तुळींज पोलीस ठाण्यात दुःखद कहाणी सांगून तक्रार दिल्यावर पोलिसांनी नवऱ्यावर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेकडील गाळानगर परिसरातील साईराम चाळीत राहणाऱ्या रिना संदीप पांडे (27) यांचे संदीप आनंद पांडे (30) याच्यासोबत सप्टेंबर 2010 मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून नवरा रिनाला हुंड्यासाठी तगादा लावला होता. नवीन रिक्षा घेण्यासाठी 50 हजार रुपये घरून आण व नवीन रूम घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्यासाठी संदीपने तगादा लावला होता. रिनाने नकार दिल्यावर मारहाण करून शिविगाळ करत होता. यानंतर सासू, सासरा, नवरा आणि नणंद रिनाची शारीरिक व मानसिक छळवणूक करण्यास सुरुवात केली. 3 एप्रिलला रात्री 11च्या सुमारास नवरा संदीप पांडे, सासरा आनंद पांडे, सासू कविता पांडे आणि नणंद छाया यांनी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेले उकळते दूध रिनाच्या अंगावर टाकल्याने गंभीर भाजली होती. आणि आवाज केला तर गॅसवर बसून पेटवून देईल अशी धमकी देत डॉक्टरकडे उपचाराला न नेता घरामध्ये कोंडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. नंतर रिनाने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन बरे झाल्यानंतर गुरुवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmilkदूधdowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाPoliceपोलिस