मुंबई - महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तिकिटे तपासणाऱ्या तोतया टीसीला सीएसएमटी रेल्वेपोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बनावट ओळखपत्रही जप्त केले. गणेश आसगावकर (वय 19) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा कोल्हापुरातील रहिवासी आहे. त्याने तयार केलेल्या बनावट ओळखपत्रावर मात्र गणेश साळोखे असे नाव लिहिले होते. तो सांगली स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची तिकिटे तपासत होता. त्यावेळी एका प्रवाशाला त्याच्यावर संशय आला. गाडी सीएसएमटी स्थानकावर आल्यानंतर त्याने यासंदर्भात हेड क्लार्कला माहिती दिली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी गणेशला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले.
तोतया टीसी घुसला महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये: रेल्वे पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 23:30 IST