शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्माकुमारी आश्रमात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 08:33 IST

आश्रमातील मृत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला

लखनौ - उत्तर प्रदेशाच्याबागपत येथील ब्रह्माकुमारी आश्रमात एका महिलेनं फाशी घेतल्याचं उघडकीस आलं. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. बागपतच्या टटरीस्थित ब्रह्माकुमारी आश्रमात महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र, मृत महिलेच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मृत महिलेला घरातून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात येत होता, असेही नातेवाईकांनी म्हटले आहे. 

आश्रमातील मृत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शिल्पा असे मृत महिलेचे नाव असून पीडित कुटुंबीयांनी आमच्या मुलीचा हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली. ही घटना येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईस्वरीय विश्वविद्यालयातील असून ब्रह्मकुमारी शिल्पाचा मृतदेह येथील एका बंद खोलीत आढळून आला. 

मृत शिल्पाला पैशांची मागणी करत सातत्याने त्रास देण्यात येत होता. त्यामुळेच, तिने आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात आग्रा येथील आश्रमातही दोन सख्ख्या बहिणींनी फाशी घेऊन आत्महत्या केली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिलाbaghpat-pcबागपत