शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसंबंधाचे आमिष, व्यापाऱ्याचे अपहरण आणि आर्थिक लुट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 14:23 IST

एका कपड्याच्या प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून त्या महिलेने युवकास भेटण्यास बोलावले...

ठळक मुद्देअपहरण करत त्याला मारहाण करून पंचवीस लाख रुपयांची मागणी

कामशेत : शहरातील एका कपड्याच्या प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून त्या महिलेने युवकास भेटण्यास बोलावले. यावेळी शरीरसंबंध करण्यासाठी युवकाला जांभूळफाटा येथील लॉजवर नेले. त्यानंतर बाहेर आल्यावर अज्ञात चार ते पाच इसमांनी त्याचे अपहरण करत त्याला मारहाण करून पंचवीस लाख रुपयांची मागणी केली. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २९) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कामशेत मधील एक व्यापारी युवकास एका अज्ञात महिलेने फोन करून भेटण्यास तळेगाव एसटी स्थानकावर भेटण्यास बोलावले. युवक तेथे गेला असता महिलेची ओळख पटली व तिने युवकाला शरीरसंबंध करण्यासाठी त्याच्या दुचाकीवरून वडगाव हद्दीतील जांभूळफाटा येथील सनराईज लॉज मध्ये घेऊन गेली. व पुन्हा बाहेर आल्यानंतर युवकास लॉज बाहेर थांबलेल्या पाच जणांनी घेराव घालत त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनात युवकास डांबून त्याचे अपहरण केले. त्यास गाडीत मारहाण करीत पवनानगर पौड रोडने अज्ञात स्थळी घेऊन जाऊन एका पडक्या घरात संपूर्ण कपडे काढून मारहाण केली. शिवाय महिलेच्या दिराला सर्व प्रकार सांगितला आहे. तिच्या लग्नासाठी पंधरा लाख रुपये खर्च केले असून तू आम्हाला पंचवीस लाख रुपये दे अशी मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील १५०० रुपये, महागडा मोबाईल घेतला. युवकाला धमकावत त्याच्या मोबाईल मधील ओनलाईन बँकिंग अप च्या माध्यमातून सुमारे ९६००० रुपये महिलेच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले. व २५ लाखातील उर्वरित रक्कम येत्या महिन्याच्या ६ तारखेपर्यंत दे अन्यथा तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दरम्यान मध्यस्थीसाठी करुंज येथील एका इसमास बोलावून घेत पीडित युवकाला त्याच्याकडे देत कामशेत मध्ये दुचाकीवर सोडले. त्यानंतर युवक जबर मारहाण झाल्याने तो कामशेत येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला असता डॉक्टरने त्याचे समुपदेशन करीत रात्री उशिरा पोलिसांना कळवले त्यामुळे सगळा प्रकार उघड झाला आहे. आणि एका महिलेसह अज्ञात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस