शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुलावर लटकलेला सापडला मृतदेह; जीन्स घालण्यावरून १७ वर्षीय मुलीची आजोबा, काकाने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 22:06 IST

Murder Case : नेहाने दिलेलं उलट उत्तरामुळे तिच्या आजी-आजोबांना आणि काका-काकूंचा राग अनावर झाला.

ठळक मुद्देसंध्याकाळी आंघोळ केल्यानंतर तिने जीन्स-टॉप घालून पूजा केली. पूजेच्या वेळी सगळं शांत होत. पूजा झाल्यानंतर तिचे आजोबा आणि काका काकू तिच्या अंगावर धावून गेले या सहा जणांनी जीन्स का घातलीस? असं म्हणत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील महुआडीह भागात १७ वर्षांच्या मुलीचा खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह तिच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर एका पुलाजवळ लटकलेला सापडला होता. नेहा पासवान असं या मुलीचं नाव असून तिचे वडील अमरनाथ हे मोलमजुरीचे काम करतात. कामानिमित्त ते लुधियानाला गेले होते. त्यांना जेव्हा मुलीची हत्या झाल्याचं कळालं तेव्हा ते आपल्या घरी पोहोचले होते.पोलिसानी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर नेहाच्या आईची चौकशी केली. आईने सांगितले की, ही घटना 20 जुलैला घातली. त्यादिवशी नेहाचा उपवास होता. सकाळी उठून तिने पूजा-अर्चा केली. संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर तिने जीन्स-टॉप घालून पूजा केली. पूजेच्या वेळी सगळं शांत होत. पूजा झाल्यानंतर तिचे आजोबा आणि काका काकू तिच्या अंगावर धावून गेले या सहा जणांनी जीन्स का घातलीस? असं म्हणत तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. नेहाने त्यांना प्रतिउत्तर देत जीन्स सरकारने परिधान करण्यासाठी बनवली आहे असे म्हटलं. यामुळे मला ती घालायची आहे मला शिकायच असून समाजात वावरायचं आहे" असे उलट उत्तर दिले. 

 

नेहाने दिलेलं उलट उत्तरामुळे तिच्या आजी-आजोबांना आणि काका-काकूंचा राग अनावर झाला. त्यांनी नेहाला मारहाण करायला सुरुवात केली. तुला जीन्स घालू देणार नाही आणि शिकूही देणार नाही असं म्हणत त्यांनी नेहाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे नेहाचा जीव गेला. नेहाची आई शकुंतला देवी हिने पोलिसांना सांगितलं की, नेहाच्या आजी-आजोबा आणि काका-काकूनी सांगितलं तुझी मुलगी बेशुद्ध पडली असून आम्ही तिला रुग्णालयात नेतो. ज्या पद्धतीने तिला रिक्षात घालण्यात आल त्यावरून आपल्या मुलीचा मृत्यू झाला असावा असा  शकुंतला देवीला संशय आला . तिने 'मुलीसोबत मी ही येते' असं अनेकदा विनवणी केली मात्र तिला या सहा जणांनी सोबत नेलं नाही.

शकुंतला देवी हिने तिच्या नातेवाईकांना या प्रकाराबाबत सांगितलं असता त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि नेहाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना इथे कोणतीही अशा नावाची मुलगी आली नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर शकुंतला देवी आणि इतरांनी नेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोधाशोध करत असताना नेहाचा मृतदेह गंडक नदीवरील पुलाजवळ लटकलेला सापडला. आरोपींनी नेहाचा मृतदेह नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिचा पाय गटारावरील जाळीत अडकला होता. त्यामुळे तो मृतदेह लटकत राहिला. पोलिसांनी या प्रकरणी नेहाचे आजोबा परमहंस, आजी भगना देवी, काका व्यास, काकू गुड्डी देवी, दुसरा काका अरविंद दुसरी काकू पूजा देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरविंद पासवानचा मित्र राजू यादव आणि रिक्षाचालक हसनैन यांच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस