शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीसाठी केलेली नाकाबंदी बेतली जीवावर, दोन मुलांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:00 IST

Crime News : सर्वत्र धुळवडीचा उत्साह सुरू असतानाच शहापुरातील काही मित्र निवांत, जंगल सफरीसाठी निघाले होते. त्यातील शहापूर चेरपोली येथील दोन जिवाभावाचे मित्र फिरण्यासाठी तांबडमाळकडे दुचाकीवरून जात होते

कसारा : सर्वत्र धुळवडीचा उत्साह सुरू असतानाच शहापुरातील काही मित्र निवांत, जंगल सफरीसाठी निघाले होते. त्यातील शहापूर चेरपोली येथील दोन जिवाभावाचे मित्र फिरण्यासाठी तांबडमाळकडे दुचाकीवरून जात होते; परंतु दोन अल्पवयीन मुलांनी होळीच्या वर्गणीसाठी केलेली नाकाबंदी एकाच्या जिवावर बेतली. खेळण्यातील या नाकाबंदीमुळे फिरायला निघायला गेलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाला दोरीचा फास बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शहापूर तालुक्यात घडली. चिंतामण भोईर, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चिंतामण व संतोष पाटील हे दोन मित्र तांबडमाळकडे फिरण्यासाठी जात असताना रस्त्यावरील एका पाड्यातील छोटी मुले होळी खेळत होती. रस्त्यावर एक दोरी बांधून जाणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांच्याकडून होळीची वर्गणी घेत होती. याचदरम्यान हे दोघे भरधाव वेगात दुचाकीवरून जात असताना चिंतामण याला समोरची नायलाॅनची दोरी दिसलीच नाही. ती दोरी गळ्याभोवती अडकल्याने भोईर व पाटील यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते रस्त्यावर पडले. दरम्यान, चिंतामण याच्या गळ्याभोवती मोठी जखम होत ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलांचे भवितव्य अंधारातदरम्यान, फिर्यादीनुसार शहापूर पोलिसांनी अल्पवयीन दोन मुलांवर गुन्हा दखल केला आहे. खेळण्याच्या नादात असणाऱ्या गोरगरिबांच्या या निष्पाप मुलांचे भवितव्य अंधारात गेले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या निष्पाप चालकाचा मृत्यू झाल्याने त्याच्या विरोधात नियतीने खेळ रचल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूthaneठाणे