शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा काळाबाजार सुरु; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यास पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 17:47 IST

हे प्रकरण चौकशी करता प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देया बेहिशोबी मालमत्तेची लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. मार्ग) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कमेची छुप्या मार्गाने देवाणघेवाण केली जाते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता जाहीर होऊन बारा तास उलटत नाहीत तोवर मंबईत पैशांचा काळाबाजार सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरातून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याकडून ६६ लाख रुपयांची रोकड पकडली आहे. या बेहिशोबी मालमत्तेची लोकमान्य टिळक मार्ग (एल. टी. मार्ग) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पैशांचे आर्थिक व्यवहार समजून घेण्यासाठी हे प्रकरण चौकशी करता प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.राज्यात निवडणुकीचे पडसाद उमटत असताना राजकीय कार्यकर्ते तसेच नेत्यांकडून पैशांची अफरातफर करण्याची शक्यता असते. मुंबईच्या भुलेश्वर पोफळवाडी परिसरातून शनिवारी मुंबई पोलिसांनी एका कार्यालयातून पहिल्याच दिवशी तब्बल ६६ लाख रुपये हस्तगत केले आहेत. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांना या बेहिशोबी पैशाची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कमेची छुप्या मार्गाने देवाणघेवाण केली जाते. हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. त्यातच ही कारवाई झाली असून टाकलेल्या या छाप्यामध्ये हस्तगत केलेली रक्कम आणि त्याचा तपशील प्राप्तिकर विभागाला देण्यात आला आहे. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :raidधाडIncome Taxइन्कम टॅक्सPoliceपोलिसArrestअटकMONEYपैसाElectionनिवडणूक