शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

धक्कादायक! प्रेमात धोका मिळाल्याने भाजपाच्या युवा नेत्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 11:25 IST

BJYM Leader Suicide : नेत्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमधून प्रेमप्रकरणात अपयश आल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. अनेकदा प्रेम प्रकरणात अपयश आल्यास टोकाचा निर्णय घेतला जातो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. प्रेमाने घात केला म्हणून भाजपाच्या युवा नेत्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. नेत्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमधून प्रेमप्रकरणात अपयश आल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील (Chattisgarh)  दुर्ग (Durg) शहरात राहणारा गोपाळ सिंह राजपूत हा भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता होता. 

गोपाळ सिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली. ज्यामध्ये प्रेमात धोका मिळाल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळने सर्वात आधी हाताची नस कापली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी गोपाळने आपल्या कुटुंबीयांसोबत रात्री एकत्र जेवण घेतलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर रात्री तो आपल्या खोलीत झोपायला निघून गेला. 

सकाळी बराच वेळ तो दार उघडत नसल्यामुळे त्याच्या भावाने दरवाजा तोडला. त्यावेळी गोपाळने गळफास घेतला होता. गळफास घेण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हाताची नसदेखील कापली होती. हे पाहून कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. गोपाळच्या पाकिटात त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. आपल्याला प्रेमात आलेलं अपयश सहन होत नसल्यामुळेच आपण आत्महत्या कऱण्याचा निर्णय घेत आहोत असं त्याने या नोटमध्ये लिहिलं आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा दिली; पेटत्या निखाऱ्यांवरून सून चालली; Video व्हायरल

सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती चक्क पेटत्या निखाऱ्यांवरून चालली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर परिसरात ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  गेल्या कित्येक दिवसांपासून सासू आणि सुनेचं पटत नव्हतं. त्यांच्यामध्ये छोटे मोठे वाद हे नेहमीच होत होते. आपल्या मुलाला काहीतरी खायला घालून सुनेने वश केलं आहे, असा आरोप सासूने केला. यावरून ती सुनेला सतत टोमणे मारायची. दररोजच्या या कटकटीला सून इतकी वैतागली की अखेर यातून मुक्ती मिळवण्यासाठी ती भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यू