शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

भाजप कार्यकर्त्याच्या हत्येचे उदयपूर कनेक्शन? कन्हैयालालच्या हत्येच्या निषेधार्थ टाकली होती पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:59 IST

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात काल भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारुंची निर्घृण हत्या झाली आहे.

बंगळुरू: कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. नेट्टारू यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. उदयपूर येथील टेलर कन्हैया लालच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पोस्ट टाकल्यामुळे नेट्टारुंची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात मंगळवारी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बेल्लारे परिसरात प्रवीण पोल्ट्रीचे दुकान चालवत असे. दिवसभर काम केल्यानंतर प्रवीण दुकान बंद करून घरी परतत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणचा मृत्यू झाला.

कन्हैयालालच्या हत्येचा निषेध29 जून रोजी प्रवीणने उदयपुरमधील टेलर कन्हैया लालच्या हत्येच्या निषेधार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्याने एक फोटोही शेअर केला आहे. राष्ट्रवादी विचारसरणीचे समर्थन करणाऱ्या टेलरची गळा चिरुन हत्या करण्यात आली, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. त्याच समर्थनामुळे नेट्टारू यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येतोय. काही दिवसांपूर्वी, भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याबद्दल राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालालची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता.

हिंदू संघटनांनी पुकारला बंद प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येप्रकरणी हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रवीणच्या हत्येचे प्रकरण पीएफआय आणि एसडीपीआयशी जोडत, दक्षिण कन्नडमधील बेल्लारे, पुत्तूर, सुल्या, कडबा येथे हिंदू संघटनांनी आज बंद पुकारला आहे. बेल्लारी येथील मुस्लिम तरुण मसूदच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 5 विशेष पथके तयार केली आहेत. यातील तीन पथके केरळच्या मडिकेरी आणि हसन येथे गेले आहेत. 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा