भाजपाचा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 04:56 PM2019-01-19T16:56:18+5:302019-01-19T16:56:38+5:30

कल्याण न्यायालयाचा निर्णय

BJP vice-president Dhananjay Kulkarni gets custody from January 22 | भाजपाचा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी 

भाजपाचा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी 

Next

डोंबिवली - रा. स्व. संघाचा कार्यकर्ता आणि भाजपाचा डोंबिवली पूर्वेचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याच्याकडून पोलिसांनी विक्रीवर बंदी असलेली तब्बल १७० शस्त्रे हस्तगत केली. यापाराकरणी कल्याण न्यायालयाने कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा ताबा गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. 

मानपाडा रोड परिसरात ‘तपस्या हाउस ऑफ फॅशन’ या दुकानात शस्त्रांचा हा साठा सापडला. कल्याण गुन्हे शाखेने मंगळवारी कुलकर्णीला अटक केली. पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी न केल्याने मंगळवारी त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र, माध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाल्याने कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू होती. कुलकर्णीने एवढी शस्त्रे कशाकरिता बाळगली होती? घातपात घडवण्याचा त्याचा प्रयत्न होता का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

काय काय सापडले?
६२ स्टील तसेच पितळी धातूचे फायटर्स, ३८ बटणचाकू, २५ चॉपर्स, १० तलवारी, ९ कुकऱ्या, ९ गुप्त्या, ५ सुरे, ३ कुºहाडी, १ कोयता, १ एअरगन

Web Title: BJP vice-president Dhananjay Kulkarni gets custody from January 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.