कल्याण - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी कल्याण शहर कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. कार्यालयाच्या फलकावर दगडफेक केली. तसेच भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेमुळे शहरात एकच राजकीय खळबळ माजली आहे.शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शिवसैनिकांसह भाजप शहर कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील होते. साळवी यांनी भाजप कार्यालयाच्या फलकावर दगड भिरकावून फलक तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यालयाच्या खिडकीच्या काचा तोडल्या. काचा तोडताना शिवसैनिक अमोल गायकवाड याचा हात रक्तबंबाळ झाला. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाच्या दारावर लाथा मारुन कुलूप बंद दार तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दार तोडण्यास मज्जाव करणा:या भाजप कार्यकर्ता प्रसाद टूमकर याला शिवसैनिकांनी मारहाण करीत कार्यालयापासून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र टूमकर हे काही कार्यालयाचा परिसर सोडण्यास तयार नव्हते. हा सगळा प्रकार घडल्यावर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण घटनास्थळी पोहचले. त्या आधीच शिवसैनिकाचा ताफा टिळकनगर शिवसेना शाखेच्या दिशेने रवाना झाला होता.
Narayan Rane : राजकीय राडा! शिवसैनिकांनी केली तोडफोड; भाजप कार्यकर्त्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:03 IST
BJP worker beaten : भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेमुळे शहरात एकच राजकीय खळबळ माजली आहे.
Narayan Rane : राजकीय राडा! शिवसैनिकांनी केली तोडफोड; भाजप कार्यकर्त्याला मारहाण
ठळक मुद्देशिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शिवसैनिकांसह भाजप शहर कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली.