भाजपा पदाधिकाऱ्याचे फेसबुक हॅक करून अश्लिल छायाचित्रे केली पोस्ट

By धीरज परब | Updated: October 20, 2023 16:12 IST2023-10-20T16:12:42+5:302023-10-20T16:12:45+5:30

माजी जिल्हाध्यक्ष, माजी सभापती राहिलेले ऍड रवी व्यास यांचे फेसबुक खाते ते स्वतः आणि पोस्ट साठी कमलेश जोशी ऑपरेट करतात.

BJP office bearer's Facebook was hacked and obscene pictures were posted | भाजपा पदाधिकाऱ्याचे फेसबुक हॅक करून अश्लिल छायाचित्रे केली पोस्ट

भाजपा पदाधिकाऱ्याचे फेसबुक हॅक करून अश्लिल छायाचित्रे केली पोस्ट

मीरारोड - भाजपाचे मीरा भाईंदर विधानसभा निवडणुक प्रमुख ऍड रवी व्यास यांचे फेसबुक हॅक करून त्यावर महिलांची अश्लील छायाचित्रे पोस्ट करणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माजी जिल्हाध्यक्ष, माजी सभापती राहिलेले ऍड रवी व्यास यांचे फेसबुक खाते ते स्वतः आणि पोस्ट साठी कमलेश जोशी ऑपरेट करतात. कमलेश यांना व्यास यांच्या फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध झाल्याचे नोटिफिकेशन आले. त्यात सबमिट रिव्ह्यू फॉर्म ची लिंक क्लिक करा सांगितले. ती क्लिक करून सबमिट ऑप्शन क्लिक केले. तासाभराने व्यास यांच्या फेसबुकवर महिलांची नग्न व अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्रे पोस्ट केली गेली. या प्रकरणी फेसबुक हॅक करून महिलांची नग्न छायाचित्रे पोस्ट केल्या बद्दल अनोळखी हॅकर विरुद्ध भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: BJP office bearer's Facebook was hacked and obscene pictures were posted