शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या खासदाराच्या मुलाला अमली पदार्थासह अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 17:15 IST

संपतिया उइके असं या भाजप खासदाराचे नाव आहे. तर सत्येंद्र हे त्यांच्या आरोपी मुलाचे नाव आहे.

ठळक मुद्देमंडला येथील पॉलिटेक्निक चौकाजवळ वाहनांची तपासणी केली जात होती.सत्येंद्र हा आपल्या दोन मित्रांसह कारमधून जात होता. संपतिया उइके हे भाजपाचे नेते असून २०१७ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले आहेत.

मध्य प्रदेश - देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना मध्य प्रदेशमधील एका भाजपाच्या खासदाराच्या मुलाला ड्रग्ससहित अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या संबंध देशात वाहत असताना सर्व उमेदवार आपल्या प्रतिमेला धक्का बसणार नाही याची काळजी घेत आहेत. मात्र, मध्य प्रदेशमधील भाजपा खासदाराच्या मुलाला अमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असं या भाजप खासदाराचे नाव आहे. तर सत्येंद्र हे त्यांच्या आरोपी मुलाचे नाव आहे.

मंडला येथील पॉलिटेक्निक चौकाजवळ वाहनांची तपासणी केली जात होती. तेव्हा सत्येंद्र हा आपल्या दोन मित्रांसह कारमधून जात होता. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडी थांबवली नाही तर याउलट त्याने आपली कार भरधाव नेली. त्यावरून पोलीसांना शंका आली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांना पकडले. तेव्हा पोलिसांसमोर तिन्ही तरूण भयभीत झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कारची तपासणी केली. त्यानंतर पोलीसांना कारमध्ये अमली पदार्थ आढळून आले. त्यामुळे तिन्ही तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, खासदाराच्या मुलासह त्याच्या मित्रांना अमली पदार्थासह अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार उघड झाला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक परिहार यांनी दिली. संपतिया उइके हे भाजपाचे नेते असून २०१७ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले आहेत. सत्येंद्रवर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा