शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 11:49 IST

Crime News : भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष किशोर याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. भाजपा खासदाराच्या मुलावर गोळीबार करण्यात आला असून चौकशीत धक्कादायक सत्य पुढे आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष किशोर याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती मिळत आहे. 

आयुषच्या मेव्हण्याला या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे याबाबत कसून चौकशी केली असता त्याने आयुषने स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतला होता. या गोळीबाराच्या प्रकरणात पाच - सहा जणांना अडकवण्यासाठी त्यानं हा कट रचल्याची माहिती दिली आहे. आदर्श असं मेव्हण्याचं नाव असून त्याने गोळीबार केल्याचं कबूल केले आहे. तसेच काही लोकांची नावं देखील सांगितली आहेत. "आयुषने पाच - सहा लोकांना अडकवण्यासाठी हा कट रचला होता. चंदन गुप्ता, मनिष जयस्वाल आणि प्रदीप कुमार सिंह यांच्यासोबत आणखी दोन जण होते परंतु, त्यांची नावं मला माहीत नाहीत."

"आयुषच्या सांगण्यावरून मी फक्त समोरून गोळी झाडली होती" अशी माहिती आदर्शने दिली आहे. मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर यांनी मुलगा आयुषने प्रेमविवाह केल्यानंतर आपण त्याच्याशी सगळे संबंध तोडले होते. त्याने आपल्याला आत्महत्येची धमकी दिली होती असं म्हटलं आहे. यानंतर आयुष आपल्या नाराज कुटुंबीयांपासून वेगळा राहत असल्याची माहिती दिली. गोळीबाराच्या घटनेनंतर आयुषला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

आयुषची पत्नी आणि मेव्हण्यावर संशय असल्याने पोलिसांनी आदर्शला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं. या प्रकरणात आयुषच्या पत्नीचीही चौकशी होणार आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाबच्या बरनालामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणीला तब्बल आठ महिने डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. 

विकृतीचा कळस! 22 वर्षीय तरुणीला डांबून ठेवलं, तब्बल 8 महिने केला बलात्कार, नंतर विकलं अन्...

पोलिसांनी पीडितेने नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाचा नेत्याचाही समावेश असल्याची माहिती आता मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच कोर्टात तिचा जबाब नोंदवण्यात आला. पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी धमकावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगून संरक्षण देण्याची विनंतीही केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाFiringगोळीबारPoliceपोलिस