शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

'पश्चिम बंगालला बांग्लादेश बनवण्याचा प्रयत्न', CM ममता बॅनर्जींचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 22:13 IST

निवासी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने राजकारण तापले आहे.

पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने राजकारण तापले आहे. विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. ममता म्हणाल्या की, 'पीडितेच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी माकप आणि भाजप या घटनेचे राजकारण करत आहेत. त्यांना वाटते की, ते पश्चिम बंगालचा बांग्लादेश करू शकतात, परंतु मी हे होऊ देणार नाही.'

सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'मला या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांशी बोलले, पीडितेच्या अंतिम संस्कारापर्यंत मी त्यांच्या संपर्कात होते. मी पीडितेच्या पालकांचेही सांत्वन केले, त्यांना सांगितले की, बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. पोलिसांनी 12 तासांत आरोपीला अटक केली. हे प्रकरण मंगळवारी सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.' 

'उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू''कोणत्याही तपासासाठी वेळ लागतो, योग्य तपास केल्याशिवाय कोणावरही कारवाई होऊ शकत नाही. मी डॉक्टरांचा आदर करते, योग्य तपासाशिवाय कोणालाही अटक करू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचेही आम्ही पूर्णपणे पालन करू आणि सीबीआयला सहकार्य करू. पोलिसांनी आधीच 34 लोकांची चौकशी केली, यादीत आणखी लोक होते, परंतु उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले,' असेही त्या म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला निवासी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. या महिला डॉक्टरवर 8 ऑगस्टच्या रात्री बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवालही समोर आला असून, तो पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडे सोपवला होता. या अहवालानुसार, पीडितेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा