शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

महाराष्ट्र पोलीस उद्धव ठाकरेंवर FIR दाखल करणार? योगींबद्दच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप नेत्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 20:41 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर आता भाजपही आक्रमक झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

यवतमाळ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांच्या विरोधात मुंबईतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात केली आहे. (BJP leader seeks FIR against uddhav over Uttar Pradesh cm should be beaten with chappals remarks) माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर आता भाजपही आक्रमक झाली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी बुधवारी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या विरोधात केलेले वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे सांगत, या चिथावणीखोर भाषणप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

फडणवीस म्हणाले होते, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, पण...; आता राणेंनीही स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

२५ ऑक्टोबर २०२०रोजी मुंबई येथील मेळाव्यात ठाकरे यांनी आदित्यनाथ यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. ‘योगी असेल तर तो मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, त्याने कोठे तरी गुहेत जावून बसायला हवे, असे सांगत त्याला त्याच्याच चपला घेवून थोबाडीत मारावे’ असे ठाकरे या भाषणात म्हणाल्याचा दावा, भुतडा यांनी केला आहे. तसेच, या भडकावू भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे सांगत या प्रकरणी चौकशी करून गुन्हा नोंदवावा, असे भुतडा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  तक्रारीबाबत चौकशी करू - पोलीस अधीक्षकया अर्जाबाबत पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना विचारले असता, उमरखेड पोलीस ठाण्यात नितीन भुतडा यांनी तक्रार अर्ज दिला आहे. ठाण्यातील संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने पोचही दिली आहे. तक्रारदाराने अर्जात म्हटल्याप्रमाणे चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

'पवारसाहेब, ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा संसस्कृतपणा बघा, राणेंनी वाचनचं केलं'

यवतमाळमधील उमरखेड शिवाय महागाव, दिग्रस, पुसद येथील पोलीस ठाण्यातही भाजपाकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचेही समजते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCrime Newsगुन्हेगारीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाYavatmalयवतमाळShiv Senaशिवसेना