शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल

By बाळकृष्ण परब | Updated: January 5, 2021 13:07 IST

Girish Mahajan News :जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवल्याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात महाजनांविरुद्ध हा मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई/पुणे - भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवल्याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात महाजनांविरुद्ध हा मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळामध्ये वाद असून, माजी मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या संचालकांकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोपही महाजन यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गिरीश महाजन यांच्यासह एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात राजकीय कारस्थानामधून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे कुणाचा हात आहे, हे सर्वांना माहिती आहे. आता या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.ही घटना तीन वर्षांपूर्वीची आहे. या तीन वर्षांत अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना गुन्हा दाखल करावासा वाटला नाही. आता त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच ही घटना कधी आणि कुठे घडली. तसेच मारहाण झाली तेव्हा ही लोकं कुठे होती याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेJalgaonजळगाव