शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या नगरसेवकाचा प्रताप; फोडलं महिलेचं डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 19:56 IST

भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये दयाशंकर रामलखन पांडे (वय ५१) हे कुटुंबासह राहतात. रंगारी काम करणाऱ्या पांडे यांनी मीरा रोडच्या कनकिया भागातील मिश्रा नावाच्या इसमाच्या घराचे रंगरंगोटीचे काम घेतले होते.

मीरारोड - रंगारीचे काम करणाऱ्यास आणि त्याच्या पत्नीला डोक्यावर लाकडी फळी मारुन डोके फोडल्याप्रकरणी भाजपा नगरसेवकासह त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये दयाशंकर रामलखन पांडे (वय ५१) हे कुटुंबासह राहतात. रंगारी काम करणाऱ्या पांडे यांनी मीरा रोडच्या कनकिया भागातील मिश्रा नावाच्या इसमाच्या घराचे रंगरंगोटीचे काम घेतले होते. परंतु, मिश्रा यांनी काम वाढवल्याने पांडे यांनी काम सोडून दिले. त्यामुळे मिश्रा हे गणेश देवल नगरचे स्थानिक भाजपा नगरसेवक अशोक तिवारी यांना घेऊन गुरुवारी पांडे यांच्याकडे आले. दोघांमध्ये समझोता झाला. परंतु गुरुवारी रात्री अशोक तिवारी हे दिलीप सिंग, लाल सिंग यांच्यासोबत पांडेंच्या घरी आले. मला शिव्या का दिल्या? असा जाब विचारत तिवारी यांनी पांडेला मारहाण सुरु केली.

पांडे यांची पत्नी सरिता (वय ४५) या पतीला वाचवण्यास मध्यस्थी करत असता तिवारी यांनी तीच्या डोक्यात लाकडी फळी मारल्याने सरिताचे डोके फुटले. याप्रकरणी अशोक तिवारीसह अन्य दोन साथीदारांविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाजपा नगरसेवक दौलत गजरे व कुटुंबाने अपशब्द वापरत एका दिवंगत पोलीसाच्या मुलीला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता तिवारी यांनी महिलेचे डोके फोडल्याच्या घटनेने राजकिय पक्ष व सामाजिक संस्थांकडून टिकेची झोड उठली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाmira roadमीरा रोडbhayandarभाइंदर