शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण गायब, पतीची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:55 IST

Jalgaon BJP corporator Jyoti Chavan disappears : महापौरपदाची निवडणूक जवळ आलेली असतानाच भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार खुद्द त्यांच्या पतींनी पोलिसात दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 जळगाव - महापौर पदाची निवडणूक जवळ आलेली असतानाच भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार खुद्द त्यांचे पती बाळासाहेब यशवंतराव चव्हाण (५२,रा.आदर्श नगर) यांनी बुधवारी रामानंद नगर पोलिसात दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुरुवारी महापौरपदाची निवड होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला ही तक्रार दाखल झाली आहे. (BJP corporator Jyoti Chavan disappears! Husband's complaint to police)

बाळासाहेब चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पत्नी ज्योती हिने सांगितले की, महापौर पदाची निवडणूक असल्याने भाजपा नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांच्यासोबत नाशिक येथे जात आहे. त्यानंतर पत्नी नाशिक येथे अनीग गिव्ह रिसोर्ट तळवाले गाव, त्र्यंबकेश्वर येथे असल्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून समजले. दुसऱ्या दिवशी पत्नीचा शोध घेण्यासाठी नाशिक येथे दुपारी ४ वाजता गेलो असता स्थानिक पोलीस निरीक्षक त्या रिसोर्टवर सोबत आले व त्यांनी दीपमाला काळे यांच्या मोबाईलवरुन पत्नीशी बोलणे करुन दिले. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवर वारंवार कॉल केले पण संपर्कच झाला नाही. पत्नीचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने कुठे तरी निघून गेल्याची खात्री झाल्यावर चव्हाण यांनी बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून पत्नी हरविल्याची तक्रार दिली.महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमधील फुटीर नगरसेवकांचा गट हा अज्ञात ठिकाणी आहे. गुरुवारी ऑनलाईन सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार असल्यामुळे अज्ञात ठिकाणी राहून सुध्दा मतदान करता येणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण