शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिम नाही "राजकीय आखाडा"! राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 16:46 IST

BJP and NCP : कल्याण डोंबिवलीत सुद्धा राजकीय वाद विकोपाला गेलेत. जुन्या राजकीय वादातूनच जिममध्ये घुसून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे.

मयुरी चव्हाण 

डोंबिवली - राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला जिममध्ये घुसून भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना आता दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत सुद्धा राजकीय वाद विकोपाला गेलेत. जुन्या राजकीय वादातूनच जिममध्ये घुसून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून मानपाडा पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. 

कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद अनेकदा विकोपाला गेलेले दिसून येत आहेत. त्यातच कल्याण ग्रामीण मधला संदप भोपर हा पट्टा कायमच वादग्रस्त चर्चेत असतो. आज सकाळी कल्याण डोंबिवलीचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस ब्रह्मा माळी हे आपल्या जिममध्ये होते. यावेळी  भाजपाचे कार्यकर्ते कुंदन माळी हे अन्य काही कार्यकर्त्यांसोबत जिममध्ये शिरले. जुन्या राजकीय वादातून कुंदन यांनी ब्रह्मा यांना मारहाण केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण ग्रामीणमधील भोपर या गावात अनेक राजकीय वाद याअगोदरही झालेत. प्रकरण पोलीस ठाण्यात गेलीत. आता या वादामुळे पुन्हा राजकरण तापलं आहे. कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनच्या आवारातली गर्दी आवरताना मात्र पोलीसांच्या चांगलंच नाकीनऊ आले. ब्रह्मा माळी यांच्या फिर्यादीवरून कुंदन माळी, नितेश सावकार, विनेश माळी आणि मुकेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर कुंदन माळी यांच्या फिर्यादीवरून ब्रह्मा माळी, रमेश पाटील दीलखुश माळी आणि पांडुरंग पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारी