शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

VIDEO: लुंगीवर पळताना बिट्टू बजरंगी, मागे पोलीस...; नूह हिंसाचारातील आरोपीला फिल्मी स्टाइल अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 08:47 IST

या अटकेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अगदी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचे दिसत आहे.

हरियाणातील नूहमध्ये झालेल्या हिंसाचारातील आरोपी बिट्टू बजरंगीला मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला फरिदाबाद येथून अटक केली. या अटकेसाठी पोलिसांना मोठी धावपळ करावी लागली आहे. या अटकेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अगदी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचे दिसत आहे.

फिल्मी स्टाईलमध्ये धरपकड -नूहची सीआयए टीम साध्या पोशाखात शस्त्र सज्ज तीन वाहनांतून फरिदाबाद येथील बिट्टूच्या घरी पोहोचली. यावेळी टीमला बघताच बिट्टू बजरंगीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसही त्याच्या मागे धावू लागले. फरिदाबादच्या ज्या गल्लीत हा संपूर्ण ड्रामा घडला, तेथे पोलिसांच्या रेड दरम्यान धावपळ उडाली होती. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर बिट्टू पोलिसांच्या हाती सापडला. पोलीस बिट्टूला पकडल्यानंतर घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. 

सरकारी कामात अडथळा - महत्वाचे म्हणजे, बिट्टू बजरंगी आणि त्याच्या 15 ते 20 इतर लोकांविरोधात नूह येथील पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्र कायदा आणि आयपीसीच्या कलम 148/149/332/353/186/395/397/506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टू बजरंगी आणि इतर 15 ते 20 लोकांनी नूहमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर तलवार आदी शस्त्रांसह घोषणाबाजी केली होती. त्याला पोलिसांनी समजावले होते. मात्र त्याने सरकारी कामात अडथळा आणला.

काय आहे संपूर्ण प्रकरण? -हरियाणातील नूह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे 31 जुलै रोजी बृजमंडल यात्रेची घोषणा केली होती. यासाठी प्रशासनाकडून परवानगीही घेण्यात आली होती. मात्र ब्रिजमंडल यात्रेत दगडफेक करण्यात आली. यानंतर काही वेळातच याचे रुपांतर दोन समुदायांतील हिंसाचारात झाले. येथील वातावरण एवढे तापले होते की, शेकडो गाड्या पेटवण्यात आल्या. सायबर पोलीस ठाण्यावरही हल्ला झाला. गोळीबारही झाला. पोलिसांवरही हल्ले झाले. एवोडेच नाही, तर नुहनंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. हा हिंसाचार आगदी फरीदाबाद आणि गुरुग्रामपर्यंत पसरला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHaryanaहरयाणा