शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! एकतर्फी प्रेमातून मुलीवर बलात्कार; ओरडू नये म्हणून तारेने तिचा गळा आवळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 15:23 IST

Crime News : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी ओरडू नये म्हणून तारेने तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या बिलासपूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 30 जून रोजी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा प्रकार समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर वेगाने या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरातील लोकांनी आरोपी सूरज कश्यप याचं अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. तो मुलीला आपल्या जाळ्यात ओढू पाहत होता. मात्र मुलीने त्याला नकार दिला. मुलीने विरोध केल्याने सूरज संतापला. याचाच बदला घेण्यासाठी त्याने आपला मित्र महेंद्र पासीसोबत मिळून मुलीवर बलात्कार करण्याचा प्लॅन आखला. 30 जून रोजी तो मुलीला भेटला आणि एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. 

मुलीवर आरोपीने बलात्कार केला. तिने आरडाओरडा करू नये म्हणून तारेने तिचा गळा आवळण्यात आला. यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिची हत्या केली. उमेश कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच देशात अशा प्रकारच्या अनेक भयंकर घटना वारंवार समोर येत आहेत. 

नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण

 एका तरुणीला तिचे वडील आणि भावाने मिळून झाडाला उलटं लटकलं आणि नंतर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर आपटून देखील तिला मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटक