शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन अल्पवयीन मुलांसह चौघे ताब्यात, २२ दुचाकी जप्त

By सोमनाथ खताळ | Updated: July 31, 2023 23:30 IST

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी केली.

बीड : राज्यासह परराज्यातील दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह चार चोरट्यांना पकडले असून त्यांच्याकडून २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी केली.

गोकुळदास मगर बोरसे, धर्मराज कल्याण बोरसे व दोन अल्पवयीन (सर्व रा.बाभुळखंटा ता.जि.बीड) असे पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी जिल्ह्यासह जालना, पुणे, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातूनही दुचाकी पळविल्या. ही टोळी एवढ्यावरच थांबली नसून कर्नाटक राज्यातूनही अनेक दुचाकींची चोरी केली आहे. 

या चोरट्यांची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीने सापळा रचून या सर्वांना पकडले. त्यांच्याकडून आतापर्यंत २२ दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशिराम जगताप, नसिर शेख, विलास ठोंबरे, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भागवत शेलार, विकी सुरवसे, सतिष कातखडे, बप्पासाहेब घोडके, गणेश मराडे आदींनी केली.

नागरिकांनो, तुमची दुचाकी ओळखा...या २२ दुचाकींमध्ये १७ दुचाकींचे नंबर समोर आले आहेत. यामध्ये एमएच २३ एएच ६५५५, एमएच २३ एी ५०४७, एमएच ४४ व्ही ८१९९, एमएच ४४ व्ही ९८६८, एमएच २३ एएम ७२६२, एमएच २३ बीबी ६९९२, एमएच २३ एमएम ३२६०, एमएच ११ सीएल २५३९, एमएच १४ डीपी ९०२३, एमएच १२ टीएक्स ६७१७, एमएच २३ एझेड ०३७८, एमएच १२ एसजी १०८२, एमएच १३ डीएच ५१५२, एमएच २१एके ७९६६, एमएच १६ बीटी ८०६८, एमएच २० एफडी १६०८, केए २९ ईजे ५१४९ या क्रमांकाच्या गाड्या चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत. जर कोणाच्या असतील तर संबंधित पोलिस ठाणे किंवा एलसीबीशी संपर्क साधावा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी