शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरून व्हायरल केला व्हिडीओ, तरूणीच्या भावांनी चाकूने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:25 IST

पीडित तरूणाचं नाव गोलू कुमार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टोला गावातील या तरूणाने आपल्याच गावाजवळीच दुसऱ्या गावातील तरूणीसोबत प्रेम विवाह केला होता.

बिहारच्या गोपालगंजमध्ये एका प्रियकराला प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरून लग्न करणं चांगलंच महागात पडलंय. प्रेयसीच्या घरातील लोकांनी या घटनेनंतर आधी प्रियकराला मारहाण केली आणि त्यानंतर चाकूने सपासप अनेक वार करत त्याला जखमी केलं. तरूणाला जखमी केल्यानंतर तरूणीचे कुटुंबीय तिला सोबत घरी घेऊन गेले.

आता जखमी तरूणाने सोशल मीडियावर लग्न करतानाचा आणि चाकूने वार केल्यावर जखमी झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियकराने आरोप लावला की, प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्याला लग्न केल्यानंतर चाकूने वार करत जखमी केलं. (हे पण वाचा : जीव देण्यासाठी डोंगराहून उडी घेतलेली महिला झाडावर अडकली, एका तासानंतर तिला असं काढलं)

पीडित तरूणाचं नाव गोलू कुमार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टोला गावातील या तरूणाने आपल्याच गावाजवळीच दुसऱ्या गावातील तरूणीसोबत प्रेम विवाह केला होता. त्याने लग्न करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि व्हिडीओ शेअर करत तरूणीच्या भांगेत कुंकू भरत लग्न केल्याचा दावा केला. (हे पण वाचा : मुंबईत झालं एकतर्फी प्रेम, नंतर जयपूरमध्ये माथेफिरू प्रियकराने घडवली 'डर' सिनेमाची कहाणी)

या व्हिडीओसोबत त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याच्या हातावर आणि पोटावर चाकूने वार केल्याच्या जखमा दिसत आहेत. पीडित तरूणाचा आरोप आहे की, तो काही कामाने घरातून बाहेर जात होता. तेव्हाच त्याच्या पत्नीच्या भावाने त्याला धरलं आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले. ही घटना सोमवारची आहे. जखमी तरूणाला स्थानिक लोकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरूणानुसार, मोबाइल फोनच्या मिस कॉलच्या माध्यमातून त्याची लव्हस्टोरी सुरू झाली होती. त्यानंतर दोघांनी सहमतीने लग्न केलं. (हे पण वाचा : शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, लग्नाच्या २ महिन्यांनंतर झाला धक्कादायक खुलासा)

लग्नानंतर दोघेही काही दिवसांपर्यंत सोबतच होते. पण सोमवारी प्रेयसीच्या भावांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि तरूणीला आपल्या सोबत घेऊन गेले. दरम्यान पीडित तरूणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ७ लोकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आणि ५५०० रूपये हिसकावून घेतल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी