बिहारमधील तुलसीपूर गावच्या परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, घरासमोर सिगारेट ओढण्यास मनाई केल्याच्या क्षुल्लक वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात संबंधित तरून गंभीर जखमी झाला आहे. पुटुस कुमार असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या उजव्या मांडीत आणि डाव्या हातात अशा दोन गोळ्या लागल्या आहेत. दरम्यान, घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला.
नेमकं काय घडलं? -मिळालेल्या माहितीनुसार, पुटुस कुमारचा भाऊ अमित कुमार आणि आरोपी विमलेश कुमार यांच्यात एक दिवसआधीच सिगारेट ओढण्यावरून वाद झाला होता. अमितने दिलेल्या माहितीनुसार, "तो लायब्ररीतून अभ्यास करून परतत असताना, त्याने विमलेशला आपल्या घरासमोर सिगारेट ओढताना पाहिले. यावर अमितने त्याला घरोजवळ सिगारेट ओढण्यास मनाई केली. यामुळे विमलेश संतापला होता. याच रागातून मनात ठेऊन विमलेशने रविवारी आपला नातेवाईक मंटू कुमार उर्फ विक्की याला बोलावले आणि अमितच्या घरी गेला. मात्र, अमित घरात नसल्याने आरोपींनी त्याचा भाऊ पुटुसवर अंदाधुंद गोळीबार केला.
गोळीबाराचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावून आले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंटू आणि विमलेशला पकडून चोप दिला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींना ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन देशी कट्टे जप्त केले आहेत.
जखमी पुटुस कुमारला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथून त्याला अधिक उपचारांसाठी मगध मेडिकल कॉलेज, गया येथे हलवण्यात आले. मारहाणीत जखमी झालेल्या मंटू कुमारला जहानाबाद सदर रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : In Bihar, a man was shot for objecting to smoking near his house. Putus Kumar sustained injuries, and villagers apprehended the shooters. Police seized weapons and are investigating. Putus is hospitalized.
Web Summary : बिहार में सिगरेट पीने को लेकर हुए विवाद में एक युवक को गोली मार दी गई। पुटुस कुमार घायल, ग्रामीणों ने हमलावरों को पकड़ा। पुलिस ने हथियार जब्त किए और जांच कर रही है। पुटुस अस्पताल में भर्ती।