बिहार विधानसभा निवडणूक, म्हशीवर बसून प्रचार; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 03:09 AM2020-10-20T03:09:24+5:302020-10-20T07:09:41+5:30

मन्सुरी हे राष्ट्रीय उलेमा कौन्सिल पक्षाचे उमेदवार असून गया गावात सोमवारी प्रचारासाठी म्हशीवर बसून गेले होते. ते गांधी मैदानापासून स्वराजपुरी रस्त्यावर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

Bihar Assembly elections, campaigning on buffalo Filed crime | बिहार विधानसभा निवडणूक, म्हशीवर बसून प्रचार; गुन्हा दाखल

बिहार विधानसभा निवडणूक, म्हशीवर बसून प्रचार; गुन्हा दाखल

Next


पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत गया मतदारसंघात म्हशीवर बसून प्रचार केल्याबद्दल मोहम्मद मन्सुरी परवेझ (४५) यांच्यावर जनावरांवर अत्याचार (प्रतिबंध) कायद्याखाली आणि कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

मन्सुरी हे राष्ट्रीय उलेमा कौन्सिल पक्षाचे उमेदवार असून गया गावात सोमवारी प्रचारासाठी म्हशीवर बसून गेले होते. ते गांधी मैदानापासून स्वराजपुरी रस्त्यावर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मन्सुरी म्हणाले की, माझा उद्देश हा राजकीय नेत्यांना बिहारमध्ये गया हे अत्यंत गलिच्छ शहर असल्याचे दाखवण्याचा होता. मी निवडणूक जिंकलो तर गया गाव प्रदूषणमुक्त करीन असा दावा त्यांनी केला.

 

Web Title: Bihar Assembly elections, campaigning on buffalo Filed crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.