शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! महिलेने छेडछाडीला विरोध केला म्हणून "त्याने" चिमुकलीला शेकोटीत फेकलं अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 16:41 IST

Crime News : आगीत होरपळलेल्या चिमुकलीला लगेचच उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मुझफ्फरपूर - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान बिहारमधील एक भयंकर घटना समोर आली आहे. मुझफ्फरपूरमध्ये महिलेने छेड काढणाऱ्याला विरोध केल्यानंतर तिच्या तीन वर्षांच्या मुलीला शेकोटीत फेकल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने तातडीने मुलीला शेकोटीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत चिमुकली आगीत होरपळली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुझफ्फरपूरमधील बोचहा गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आगीत होरपळलेल्या चिमुकलीला लगेचच उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घराबाहेर पेटवलेल्या शेकोटीच्या बाजूला महिला बसली होती. एकटीला पाहून गावातील तरूण त्या ठिकाणी आला आणि शेक घेण्याच्या बहाण्याने शेकोटीजवळ बसला. थोड्या वेळाने त्याने महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली.

महिलेने या छेडछाडीला विरोध केला. त्यावेळी रागाच्या भरात आरोपीने महिलेच्या कुशीत असलेल्या तिच्या तीन महिन्यांच्या मुलीला हिसकावलं आणि शेकोटीत फेकलं. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. महिलेने आपल्या चिमुलीला शेकोटीतून बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत ती होरपळली होती. महिलेने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

विकृतीचा कळस! रुग्णालयाच्या ICU मध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, घटनेने खळबळ

महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना हरियाणाच्या पानीपतमध्ये घडली आहे. एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. एका 22 वर्षीय तरुणीला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तसेच तिला त्रास होऊ लागल्याने हरियाणाच्या मॉडल टाऊन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये तरुणीवर उपचार सुरू होते. त्याच दरम्यान रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दोन जणांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस