शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना

By आप्पासाहेब पाटील | Updated: June 15, 2025 10:11 IST

सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळजवळ स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख रहीम शेख ठार

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास ठार मारण्यात आले आहे. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळजवळ घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील काळेवाडी पोलीस स्टेशन परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला शाहरुख रहीम शेख (रा. हडपसर, पुणे ) हा सोलापूर -पुणे महामार्गावरील  लांबोटी येथील नरोटे वस्ती येथे राहत असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँच यांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी त्यांनी रात्री घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने  पोलिसांवर पिस्टलमधून प्रारंभी पोलीसांवर फायर केले. यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे.

याबद्दल अधिकची माहिती अशी की, पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सराईत गुंड आणि मोका अंतर्गत फरार असलेला आरोपी शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (वय २३, रा. गल्लीनं. २३/ए, सय्यद नगर, हडपसर) याचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ लांबोटी गावात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. शाहरुख हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. हडपसर, वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात त्याचे विरोधात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी केलेल्या मोका कारवाईनंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपी शाहरुख हा सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावातील नातेवाईकांकडे लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. 

त्यानंतर गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी शनिवारी मध्यरात्री लांबोटी गावात गेले. पहाटे अंधारात पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शाहरुखने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार करत त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत शाहरुख गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

काय आहे शाहरुख शेख याचा गुन्हेगारी इतिहास?

शाहरुख हा पुण्यातील टिपू पठाण टोळीचा सक्रिय सदस्य होता. या टोळीने खंडणी, बेकायदेशीर धंदे, दहशत निर्माण करणं, वसुली यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे पुण्यात आपला जम बसवला होता. शाहरुख याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा, खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास सुरु होता. पोलिसांनी मोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली होती आणि तो सध्या फरार होता.

पोलिसांची धाडसी कारवाई; गुन्हेगारीस आळा?

या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, टिपू पठाण टोळीच्या हालचालींवर पोलिसांनी पुन्हा एकदा शिकंजा कसल्याचं दिसून येत आहे. या कारवाईनंतर आणखी काही फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक गतिमान केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरPoliceपोलिस