Bihar accident: बिहारमध्ये मोठी दुर्घटना! नदीमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:01 IST2021-09-26T12:01:08+5:302021-09-26T12:01:25+5:30
Bihar Boat accident: होडीमध्ये २० ते २५ जण होते. गोढिया गावात होडी बुडाली. यामुळे तिथे खळबळ उडाली.

Bihar accident: बिहारमध्ये मोठी दुर्घटना! नदीमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता
बिहारच्या मोतिहारीमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सिकरहना नदीमध्ये होडी उलटल्याने २२ जण बुडाले आहेत. स्थानिकांनी एक मृतदेह बाहेर काढला असून अन्य लोकांचा शोध सुरु आहे. ( boat capsizes in river motihari, 22 missing,1 dead.)
ही दुर्घटना शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोढिया गावात घडली आहे. स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून प्रशासन बचावकार्याला लागले आहे.
स्थानिकांनी सांगितले की, होडीमध्ये २० ते २५ जण होते. गोढिया गावात होडी बुडाली. यामुळे तिथे खळबळ उडाली. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. स्थानिक देखील प्रशासनाला मदत करत आहेत.