शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरी कार, धर्मांतर आणि जबरदस्तीने निकाह; ब्युटीशियन बहिणींच्या सिंडिकेटची इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:34 IST

न्यू मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या हिंदू तरुणीने पोलिसांकडे आपली वेदनादायक व्यथा मांडली आहे.

भोपाळच्या अब्बास नगरमधून सुरू झालेलं नेटवर्क आता होशंगाबाद रोडवरील 'सागर रॉयल व्हिला'पर्यंत पसरलं होतं. अमरीन ऊर्फ माहिरा आणि आफरीन या दोन ब्युटीशियन बहिणींवर आरोप आहे की, त्यांनी केवळ मुलींना देहव्यापाराच्या दलदलीत ढकललं नाही, तर त्यांना अंमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार आणि जबरदस्तीने धर्म परिवर्तनासाठी दबावही टाकला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

न्यू मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या हिंदू तरुणीने पोलिसांकडे आपली वेदनादायक व्यथा मांडली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ८ जून २०२४ रोजी एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिची ओळख संजना नावाच्या मुलीशी झाली. संजनानेच तिची भेट अमरीनशी करून दिली. ऑगस्ट २०२५ मध्ये अमरीनचा मित्र चंदन यादव पीडितेला आपल्या बहिणीच्या घरी घेऊन गेला आणि तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला.

अमरीन आणि चंदनने पीडितेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि कुराण वाचण्यासाठी दबाव आणला. तपासात असं समोर आलं आहे की, या टोळीतील दुसरी सदस्य संजना हिने देखील धर्म परिवर्तन करून आपलं नाव 'जन्नत' ठेवलं होतं आणि अमरीनचा भाऊ हैदर याच्याशी लग्न केलं होतं. पीडितेवर तोकडे कपडे घालून क्लब आणि पार्ट्यांमध्ये जाण्याची सक्ती केली जात असे. असाही आरोप आहे की, अमरीनचा भाऊ बिलाल याने अब्बास नगरमध्ये आणि याशिरने तिला अहमदाबादला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

स्थानिक रहिवाशांनी या गँगबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. अमरीन आणि आफरीनच्या घराजवळ उशिरा रात्रीपर्यंत लक्झरी गाड्यांची वर्दळ असायची. पाश्चात्य आणि तोकडे कपडे घातलेल्या मुलींचे तिथे येणं-जाणं सामान्य झालं होतं. परिसराची होणारी बदनामी आणि या अनैतिक कृत्यांमुळे अनेक कुटुंबांना आपली घरं सोडून जावं लागलं. लोकांचा विरोध वाढल्यानंतर या दोन्ही बहिणी होशंगाबाद रोडवरील पॉश 'सागर रॉयल विला'मध्ये राहायला गेल्या, जिथे त्यांनी पुन्हा हेच नेटवर्क सुरू केले.

बागसेवनिया पोलीस ठाण्याने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कडक कारवाई सुरू केली आहे. मुख्य आरोपी अमरीन आणि चंदन यादव यांना पोलिसांनी ५ दिवसांच्या रिमांडवर घेतलं आहे. दुसरी बहीण आफरीनची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलीस आता यासिर, चानू आणि बिलाल यांचा शोध घेत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडितेच्या जबाबाच्या आधारे बलात्कार आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे एक पथक अहमदाबादलाही रवाना झालं आहे. "इतर कोणत्याही मुली या टोळीच्या बळी ठरल्या असतील, तर त्यांनी समोर यावं, त्यांच्या तक्रारीवरही कडक कारवाई केली जाईल. आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे" असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Luxury cars, conversion, forced marriage: Beautician sisters' syndicate exposed

Web Summary : Bhopal beautician sisters Amreen and Afreen ran a syndicate forcing women into prostitution, drug abuse, and religious conversion. Police are investigating, arresting key suspects, and seeking other victims. The gang operated from Abbas Nagar to Sagar Royal Villa.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHinduहिंदू