शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव प्रकरणी आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 16:12 IST

Bhima Koregaon Case: भीमा-कोरेगावमध्ये (Bhima-Koregaon Violence) 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली होती.

ठळक मुद्देकेंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणी NIA ने आठ जणांविरुद्ध १० हजार पानांचे आरोपपत्र विशेष NIA न्यायालयात आज दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.भीमा-कोरेगावमध्ये (Bhima-Koregaon Violence) 2018 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली होती. 83 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी (Father Stan Swamy) यांना झारखंडमधून अटक करण्यात आली होती. भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमने गुरुवारी रात्री फादर स्टेन स्वामी यांना नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. जवळपास 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर स्वामी यांना अटक केली होती.'फादर स्टेन स्वामी हे एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं आहे. झारखंडच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी स्वामी यांच्या अटकेला विरोध सुरू केला आहे. ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "फादर स्टॅन स्वामी यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच आदिवासींच्या अधिकारासाठी लढण्यात घालवलं. त्यामुळेच मोदी सरकार अशा लोकांना गप्प करण्याच्या मागे आहे. कारण या सरकारासाठी कोळसा खाण कंपन्यांचा फायदा आदिवासींचं आयुष्य आणि रोजगाराहून अधिक महत्त्वाचा आहे" असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं.भीमा-कोरेगाव प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना अटक  भीमा-कोरेगाव प्रकरणात आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना अटक करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्याच्या भीमा कोरेगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हिंसाचार उफाळला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता फादर स्टॅन स्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले संशयित आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्हवरवरा राव यांचा विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून वरवरा राव (81) यांनी जामिनावर सुटकेसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 26 जून रोजी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला. राव यांचा वैद्यकीय अहवाल आणि त्यानुसार कारागृह प्रशासनाने केलेले उपचार याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश तळोजा कारागृहाला द्यावेत. तसेच राव यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारCourtन्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा